जया बच्चन नाही, तर 'हे' होतं रेखा-अमिताभ वेगळे होण्याचं खरं कारण! अभिनेत्रीच्या बेस्टफ्रेंडचा मोठा खुलासा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Amitabh Bachchan-Rekha Breakup: मेगास्टार अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्यावर अनेक चर्चा झाल्या, पण ते दोघे एकमेकांपासून का दूर झाले, याबद्दलचे गूढ कायम होते. आता रेखाच्या एका जुन्या आणि जवळच्या मैत्रिणीने यावर मोठा खुलासा केला आहे.
advertisement
1/9

मुंबई: बॉलिवूडच्या इतिहासात काही प्रेमकथा अमर ठरल्या, पण या अमर कथा अपूर्णही राहिल्या. त्यात सर्वांत आधी नाव येते ते मेगास्टार अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे. आजही त्यांच्या नात्याबद्दल लोक जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.
advertisement
2/9
दोघांच्या नात्यावर अनेक चर्चा झाल्या, पण ते दोघे एकमेकांपासून का दूर झाले, याबद्दलचे गूढ कायम होते. आता रेखाच्या एका जुन्या आणि जवळच्या मैत्रिणीने यावर मोठा खुलासा केला आहे.
advertisement
3/9
लेखिका आणि व्यावसायिक बीना रमानी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्या काळात रेखा कोणत्या मानसिक आणि भावनिक संघर्षातून जात होती, हे मोकळेपणाने सांगितले.
advertisement
4/9
बीना रमानी या रेखाच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणी होत्या. त्यांनी सांगितले की, रेखाला अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे आपले नाते लपवायचे नव्हते, उलट तिची इच्छा होती की अमिताभ यांनी हे नाते जगासमोर स्वीकारावे. रमानी यांच्या मते, या नात्याचा शेवट होण्यामागे दोन मुख्य कारणे होती.
advertisement
5/9
यातील पहिले कारण म्हणजे, जया बच्चन यांच्याशी झालेले अमिताभ यांचे लग्न आणि दुसरे म्हणजे अमिताभ यांनी राजकारणात केलेला प्रवेश. रमानी म्हणतात, "रेखा माझी खूप चांगली मैत्रीण होती. त्या काळात ती खूपच निरागस होती. तिच्याकडून काही चूक झाली असेल, तर ती फक्त तिच्या निरागसपणामुळेच होती."
advertisement
6/9
रमानी यांनी रेखाच्या भावनिक बाजूवर अधिक प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, रेखा आपल्या बालपणीच्या भावनिक बंधनांमध्ये अडकलेली होती. आई-वडिलांच्या विभक्त होण्यामुळे तिच्या आयुष्यात प्रेमाची मोठी कमतरता होती आणि म्हणूनच ती कधीही प्रेमाबद्दल पूर्णपणे समाधानी राहू शकली नाही.
advertisement
7/9
"वयाच्या अवघ्या १३-१४ व्या वर्षी रेखाने काम सुरू केले. त्यामुळे तिला तिचे बालपणही व्यवस्थित जगता आले नाही," असेही रमानी यांनी सांगितले. रेखा नेहमी आयुष्यात भावनिक सुरक्षिततेचा शोध घेत होती आणि तो आधार तिला अमिताभ यांच्यात मिळाला.
advertisement
8/9
बीना रमानी यांना जेव्हा अमिताभबद्दल रेखा यांच्या भावना काय होत्या, असे विचारले गेले, तेव्हा त्यांनी एक अत्यंत भावनिक गोष्ट सांगितली, "रेखा असे मानत होती की, आत्म्याने ती अमिताभची आहे आणि आत्म्याने अमिताभही तिचेच आहेत."
advertisement
9/9
रमानी यांनी त्या कठीण क्षणाचाही उल्लेख केला, जेव्हा हे नाते तुटले. अमिताभ राजकारणात सक्रिय झाल्यानंतर रेखा त्यांना भेटण्यासाठी न्यूयॉर्कला गेल्या होत्या. तिथेच, कदाचित अमिताभ बच्चन यांनी रेखाला सांगितले असावे की, आता ते एकत्र राहू शकत नाहीत आणि त्यांचे नाते कधीच सार्वजनिक होऊ शकणार नाही. या निर्णयाने या जोडीची साथ कायमची तुटली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
जया बच्चन नाही, तर 'हे' होतं रेखा-अमिताभ वेगळे होण्याचं खरं कारण! अभिनेत्रीच्या बेस्टफ्रेंडचा मोठा खुलासा