TRENDING:

Prithvi Shaw : दोनदा UNSOLD, तिसऱ्यांदा पृ्थ्वीवर बोली, एक रूपयाही वाढवून मिळाला नाही, किती पैसे मिळाले?

Last Updated:
पृथ्वी शॉ दोनदा अनसोल्ड राहिला होता.त्याला संघात घेण्यास कोणतीच फ्रेंचायजी उत्सुकता दाखवत नव्हती.पण शेवटी तिसऱ्या फेरीत पृथ्वी शॉवर बोली लागली आहे.
advertisement
1/7
दोनदा UNSOLD, तिसऱ्यांदा पृ्थ्वीवर बोली, एक रूपयाही वाढवून मिळाला नाही, किती पै
अबुधाबीमध्ये सूरू असलेला आयपीएल 2026 चा लिलाव संपला आहे.या लिलावात नवखे खेळाडू भाव खाऊन गेले आहेत. तर स्टार खेळाडूंवर हवीतशी बोली लागली नाही आहे.
advertisement
2/7
या लिलावात पृथ्वी शॉ दोनदा अनसोल्ड राहिला होता.त्याला संघात घेण्यास कोणतीच फ्रेंचायजी उत्सुकता दाखवत नव्हती.पण शेवटी तिसऱ्या फेरीत पृथ्वी शॉवर बोली लागली आहे.
advertisement
3/7
दोनदा अनसोल्ड राहिल्यानंतर पृथ्वी शॉला ज्या दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केले होते. त्याच संघाने त्याला संघात संधी दिली होती.
advertisement
4/7
विशेष म्हणजे पृथ्वी शॉची बेस प्राईज ही 75 लाख होती. याच किमतीत पृथ्वी शॉला दिल्लीने पुन्हा ताफ्यात घेतलं आहे. यावर एकही रूपया वाढवून त्याला मिळाला नाही आहे.
advertisement
5/7
पहिल्यांदा अनसोल्ड राहिल्यानंतर पृथ्वी शॉ प्रचंड नाराज झाला होता. तुम्ही सगळं बघताय ना साई बाबा, अशी पोस्ट पृथ्वी शॉने सोशल मीडियावर केली होती.
advertisement
6/7
पृथ्वी शॉने यावर्षी मुंबई सोडून महाराष्ट्र संघात प्रवेश केला होता. यावेळी रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याने 7 डावांमध्ये 470 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने चंदिगडविरूद्द 222 धावांची खेळी केली होती.तसेच सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने 36 बॉलमध्ये 66 धावांची खेळी केली होती.
advertisement
7/7
पृथ्वी शॉ गेल्या अनेक वर्षापासून आपल करीअर योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करतोय. यासाठी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रचंड मेहनत घेतो आहे. दरम्यान इतकी मेहनत घेऊन देखील त्याला संधी मिळत नाही आहे. त्यामुळे पृथ्वी शॉ प्रचंड खचलेला दिसतो आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Prithvi Shaw : दोनदा UNSOLD, तिसऱ्यांदा पृ्थ्वीवर बोली, एक रूपयाही वाढवून मिळाला नाही, किती पैसे मिळाले?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल