IPL 2026 : तेजस्वीनंतर आणखी एका नेत्याच्या मुलाची IPL मध्ये एन्ट्री, आई-वडील दोघंही खासदार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये राजकीय नेत्याच्या मुलाची एन्ट्री झाली आहे. आयपीएल लिलावामध्ये खासदाराच्या मुलावर केकेआरने बोली लावली आहे.
advertisement
1/7

तेजस्वी यादव यांच्यानंतर आता आणखी एका राजकीय नेत्याचा मुलगा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. आयपीएल 2026 च्या लिलावामध्ये साथर्क रंजन याला केकेआरने 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं.
advertisement
2/7
29 वर्षीय सार्थक रंजन हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. तो उजव्या हाताने बॅटिंग करतो आणि ऑफ-स्पिन देखील टाकू शकतो.
advertisement
3/7
अलीकडेच, तो दिल्ली प्रीमियर लीगमध्ये उत्तर दिल्लीकडून खेळला, त्याने 9 सामन्यांमध्ये 449 रन केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 146.73 होता, ज्यामध्ये 21 सिक्स आणि 44 फोरचा समावेश होता.
advertisement
4/7
साथर्क रंजनने 2017 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये गौतम गंभीरसोबत इनिंगची सुरुवात केली होती. त्या सामन्यात सार्थकने 37 रन केल्या होत्या. डिसेंबर 2024 मध्ये त्याने स्पर्धेत शानदार पुनरागमन देखील केले.
advertisement
5/7
सार्थक फिटनेसला त्याच्या कारकिर्दीचा महत्त्वाचा भाग मानतो. तो नियमितपणे जिम आणि प्रशिक्षण सत्रांमध्ये वेळ घालवतो, ज्यामुळे त्याची चपळता आणि मैदानावरील ऊर्जा टिकून राहते.
advertisement
6/7
सार्थक रंजन हा बिहारच्या पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांचा मुलगा आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी, तेजस्वी यादव एक क्रिकेटपटू होते. ते दिल्लीच्या अंडर-15, अंडर-17 आणि अंडर-19 टीमसाठी क्रिकेट खेळले.
advertisement
7/7
तेजस्वी यादव 2008 ते 2012 पर्यंत दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) टीमचा भाग होते. पण त्यांना कधीही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : तेजस्वीनंतर आणखी एका नेत्याच्या मुलाची IPL मध्ये एन्ट्री, आई-वडील दोघंही खासदार!