Ajinkya Rahane : रहाणेची जागा धोक्यात! KKR चा कॅप्टन कोण होणार? दोन खेळाडूंची अचानक एन्ट्री
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 चा लिलाव झाल्यानंतर आता केकेआर अजिंक्य रहाणेलाच पुन्हा कर्णधार म्हणून कायम ठेवणार का? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
advertisement
1/6

केकेआरने आयपीएल 2026 साठी संतुलित टीम बनवल्याचं अनेक तज्ज्ञ आणि चाहते म्हणत आहेत. केकेआरने लिलावाआधीच त्यांचा प्रशिक्षक बदलला. चंद्रकांत पंडित यांची जागा अभिषेक नायरने घेतली.
advertisement
2/6
केकेआरने श्रेयस अय्यरनंतर अजिंक्य रहाणेला कर्णधार केलं. मागच्या आयपीएलमध्ये रहाणेने बॅटिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, पण रहाणेच्या कर्णधारपदाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते.
advertisement
3/6
केकेआरने रिटेन केलेले खेळाडू : रिंकू सिंग, अंगरिक्ष रघुवंशी, रोव्हमन पॉवेल, अजिंक्य रहाणे, मनिष पांडे, सुनिल नारायण, रमणदीप सिंग, अनुकूल रॉय, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, वैभव अरोरा, उमरान मलिक
advertisement
4/6
केकेआरने लिलावामध्ये कॅमरून ग्रीन, फिन ऍलन, मथिशा पथिराणा, तेजस्वी सिंग, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, टीम सायफर्ट, मुस्तफिजुर रहमान, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र, आकाश दीप
advertisement
5/6
केकेआर आयपीएल 2026 मध्ये रहाणेला पुन्हा कर्णधार करणार का नव्या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा सोपावणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
6/6
रहाणेकडून कॅप्टन्सी काढून घेतली तर केकेआरकडे कॅमरून ग्रीन आणि रिंकू सिंग हे कॅप्टन्सीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. मागच्या मोसमात केकेआरने रहाणेला 2 कोटींना विकत घेतलं आणि मग त्याला कर्णधार केलं, पण खराब कामगिरीनंतर केकेआर कॅप्टन बदलणार का? याबाबत मात्र टीमने सस्पेन्स कायम ठेवला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Ajinkya Rahane : रहाणेची जागा धोक्यात! KKR चा कॅप्टन कोण होणार? दोन खेळाडूंची अचानक एन्ट्री