TRENDING:

IND vs PAK : छोट्याश्या गावातून येऊन पाकिस्तानला नमवलं, पहिल्याच वर्ड कपमध्ये मैदान गाजवलं, कोणी उडवली पाकची झोप?

Last Updated:
भारताच्या क्रांती गौडने 2025 च्या महिला विश्वचषकात पाकिस्तानी संघाविरुद्ध शानदार कामगिरी केली. पाकिस्तानी फलंदाज तिला तोंड देऊ शकले नाहीत आणि ते पूर्णपणे अपयशी ठरली.
advertisement
1/7
10 ओव्हर, 20 रन्स…, मध्य प्रदेशच्या गावातून येऊन उडवली पाकिस्तानची झोप!
भारताच्या क्रांती गौडने 2025 च्या महिला विश्वचषकात पाकिस्तानी संघाविरुद्ध शानदार कामगिरी केली. पाकिस्तानी फलंदाज तिला तोंड देऊ शकले नाहीत आणि ते पूर्णपणे अपयशी ठरली.
advertisement
2/7
क्रांतीने 10 षटकांत फक्त 20 धावा देऊन तीन विकेट घेत पाकिस्तानी फलंदाजीचा क्रम उद्ध्वस्त केला. तिच्या दमदार कामगिरीसाठी तिला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
advertisement
3/7
क्रांती गौड सामन्यानंतर म्हणाली, "भारतासाठी माझ पदार्पणही श्रीलंकेत झाल आणि आज मला येथे सामनावीर म्हणून निवडण्यात आले आहे. हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे, मी खूप आनंदी आहे.
advertisement
4/7
मध्य प्रदेशातील बुंदेलखंडमधील घुवारा येथील रहिवासी असलेल्या क्रांती गौडने अल्पावधीतच क्रिकेट जगतात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. गेल्या वर्षी, ती महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्ससाठी नेट गोलंदाज होती.
advertisement
5/7
त्यानंतर, वरिष्ठ गोलंदाज रेणुका ठाकूर आणि पूजा वस्त्राकर यांच्या दुखापती तिच्यासाठी वरदान ठरल्या. तिला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आणि तिने त्याचा फायदा घेतला.
advertisement
6/7
क्रांतीने इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर शानदार कामगिरी केली, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सहा विकेट्स घेतल्या आणि तेव्हापासून ती संघातील एक महत्त्वाची खेळाडू आहे.
advertisement
7/7
उजव्या हाताची वेगवान गोलंदाज क्रांती गौडने 10 षटकांत फक्त 20 धावा देत 3 बळी घेतले आणि पाकिस्तानविरुद्ध भारताच्या शानदार विजयात मोठी भूमिका बजावली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : छोट्याश्या गावातून येऊन पाकिस्तानला नमवलं, पहिल्याच वर्ड कपमध्ये मैदान गाजवलं, कोणी उडवली पाकची झोप?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल