MI vs KKR : रोहित शर्मा नाही तर 'हा' स्टार खेळाडू असेल मुंबई इंडियन्सचा इम्पॅक्ट प्लेयर! टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवलाय
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mumbai Indians Impact Player : रोहित शर्माचा टीममधील रोल क्लियर आहे. अनुभवी खेळाडू म्हणून तो मॅच दरम्यान टीमला मोलाचे मार्गदर्शन करत राहील, असं महिला जयवर्धने म्हणाला होता. त्यामुळे रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर नाही, हे स्पष्ट होतंय.
advertisement
1/7

रोहितच्या मानसिकतेबद्दल कोणतीही शंका नाही. रोहित शर्माने मागील काही महिन्यात खूप मेहनत घेतली आहे. गेल्या एका आठवड्यात, त्याने आपल्या कौशल्यांवर कसून काम केलं आहे, असं महिला जयवर्धने म्हणाला होता.
advertisement
2/7
रोहित शर्माचा टीममधील रोल क्लियर आहे. अनुभवी खेळाडू म्हणून तो मॅच दरम्यान टीमला मोलाचे मार्गदर्शन करत राहील, असं महिला जयवर्धने म्हणाला होता. त्यामुळे रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर नाही, हे स्पष्ट होतंय.
advertisement
3/7
जर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा इम्पॅक्ट प्लेयर नसेल तर मग पलटणचा इम्पॅक्ट प्लेयर कोण? असा सवाल विचारला जातोय. अशातच आता सूर्यकुमार यादवचं नाव चर्चेत आहे.
advertisement
4/7
होय, टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या सूर्याला इम्पॅक्ट प्लेयरचा रोल मिळू शकतो. तिलक वर्मा, रोहित आणि क्विंटन डी कॉक यांना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवू शकत नाही. अशातच सूर्याला तडजोड करावी लागेल.
advertisement
5/7
सूर्यकुमारला आपल्या फॉर्मबद्दल फारशी काळजी वाटत नाही, असं जयवर्धने म्हणाला होता. होय, सातत्य हा असा एक घटक असतो, ज्यावर त्याला नक्कीच काम करायची गरज आहे, असंही जयवर्धने म्हणाला होता.
advertisement
6/7
त्यामुळे यंदाच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून सूर्याला खेळवणार की काय? असा सवाल विचारला जात आहे. इम्पॅक्ट प्लेयर हा मॅचमध्ये निर्णयक असतो. त्यामुळे सूर्याला आनंदाने हा रोल निभावताना दिसतो.
advertisement
7/7
दरम्यान, जयवर्धने याने यावेळी जसप्रीत बुमराहचं देखील कौतुक केलं. बुमराहची कामाप्रती असलेली निष्ठा आणि खेळाला समजून घेण्याची त्याची पद्धत अद्वितीय आहे, असं जयवर्धने म्हणाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
MI vs KKR : रोहित शर्मा नाही तर 'हा' स्टार खेळाडू असेल मुंबई इंडियन्सचा इम्पॅक्ट प्लेयर! टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवलाय