विराट कोहलीमुळे नाना पाटेकरांना रहावं लागणार उपाशी? नेमकी भानगड काय? सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Nana Patekar Virat Kohli Memes : बॉलिवूडचे स्टार अभिनेते नाना पाटेकर यांच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडलाय. नाना पाटेकर विराट कोहलीवर काय म्हणाले होते? जाणून घ्या.
advertisement
1/7

टीम इंडियाचा स्टार प्लेयर विराट कोहली याला आज पुन्हा चांगली खेळी करता आली नाही. विराट पुन्हा ऑफ स्टंपचा बॉल खेळण्याचा नादात बाद झाला.
advertisement
2/7
अशातच आता सोशल मीडियावर विराट कोहली आऊट होताच नाना पाटेकर ट्रेंड होऊ लागले. नाना पाटेकर आणि विराट कोहली यांचा काय संबंध? जाणून घ्या.
advertisement
3/7
विराट कोहली माझा आवडता प्लेयर आहे. विराट जर लवकर बाद होत असेल तर मला जेवायची इच्छा होत नाही, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं होतं.
advertisement
4/7
नाना पाटेकर यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. त्यात आज विराट पुन्हा फेल ठरल्याने नेटकऱ्यांनी नाना पाटेकरांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
advertisement
5/7
नाना पाटेकर यांनी विराट कोहलीसाठी केलेल्या वक्तव्यानंतर त्यानंतर युजर्सनी मजेदार मीम्स शेअर केले. नाना पाटेकरांना नाष्टा गेला का? कुणीतरी विचारा, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.
advertisement
6/7
नाना पाटेकरांना आज पुन्हा उपाशी झोपावं लागणार. विराटने तर नानांना नवरात्रीचा फिल दिलाय, अशा भन्नाट कमेंट देखील काही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
advertisement
7/7
दरम्यान, नाना पाटेकरांना विराटमुळे जेवण करायला मिळत नाहीये. त्यामुळे विराटला टीममधून आधी बाहेर काढा, अशी भन्नाट मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
विराट कोहलीमुळे नाना पाटेकरांना रहावं लागणार उपाशी? नेमकी भानगड काय? सोशल मीडियावर मीम्स व्हायरल