कॅप्टन गिल-पंतला डच्चू, वनडे वर्ल्ड कपसाठी अश्विनची धक्कादायक Playing XI, रोहित-विराटला नवी जबाबदारी!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली-रोहित शर्मा खेळणार का नाही? याबद्दल बऱ्याच चर्चा सुरू आहेत. पण दुसरीकडे भारताचा माजी क्रिकेटपटू आर.अश्विनने 2027 वर्ल्ड कपच्या प्लेइंग इलेव्हनबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
advertisement
1/7

'तुम्ही 2027 ला दक्षिण आफ्रिकेत जात आहात. श्रेयस अय्यर पुनरागमन करेल तेव्हा तो चौथ्या क्रमांकाचा सर्वोत्तम खेळाडू आहे. ऋतुराजलाही तुम्ही विराट-रोहितसोबत टॉप-4 मध्ये वापरू शकता. ओपनिंगला कोण येईल ते मला माहिती नाही, पण विराट-रोहितने ओपनिंगला यावं, असं मला वाटतं. विराट टी-20 मध्ये ओपन करतो', असं अश्विन म्हणाला.
advertisement
2/7
'मी शुभमन गिलचं नाव विसरूनच गेलो, पण स्पर्धा खूप जास्त आहे. ऋतुराजला योग्य संधी मिळाली पाहिजे', असं अश्विनने स्पष्ट केलं आहे.
advertisement
3/7
अश्विनने केलेली ही मागणी मान्य झाली तर कर्णधार शुभमन गिल यालाच टीममध्ये स्थान मिळणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजवेळी गिलला भारताच्या वनडे टीमचं पूर्णवेळ कर्णधार करण्यात आलं. रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून गिलकडे ही जबाबदारी देण्यात आली.
advertisement
4/7
अश्विनने सांगितलेल्या या प्लेइंग इलेव्हनमध्ये विराट आणि रोहित ओपनिंगला येतील तर ऋतुराज तिसऱ्या आणि श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळतील. यानंतर पाचव्या क्रमांकावर केएल राहुल बॅटिंगला येईल.
advertisement
5/7
अश्विनने सांगितलेल्या या प्लेइंग इलेव्हनमुळे फक्त गिल आणि ऋषभ पंतच नाही तर टीम इंडियाच्या आणखी काही दिग्गजांचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न भंगेल. यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, तिलक वर्मा यांच्याही वर्ल्ड कप खेळण्याच्या स्वप्नांना धक्का बसेल.
advertisement
6/7
2027 चा वनडे वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये विराट-रोहित खेळणार का नाही? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनीही थेटपणे उत्तर देणं टाळलं. पण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये विराट-रोहितने सगळ्यांची बोलती बंद केली.
advertisement
7/7
रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक शतक आणि एक अर्धशतक तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये अर्धशतक केलं. दुसरीकडे विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अर्धशतक आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये शतकं ठोकली आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
कॅप्टन गिल-पंतला डच्चू, वनडे वर्ल्ड कपसाठी अश्विनची धक्कादायक Playing XI, रोहित-विराटला नवी जबाबदारी!