घटस्फोटाच्या 90 दिवसांतच थाटला दुसरा संसार! 'देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेने गुपचूप उरकलं लग्न, पाहा पहिला फोटो
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Shubhangi Sadavarte Second Marriage: 'संगीत देवबाभळी' नाटकातून संत तुकारामांची पत्नी जिजाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्तेने घटस्फोटानंतर अवघ्या तीनच महिन्यांत पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे!
advertisement
1/10

मुंबई: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अभिनेत्री शुभांगी सदावर्ते तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे.
advertisement
2/10
'संगीत देवबाभळी' नाटकातून संत तुकारामांची पत्नी जिजाईची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री सप्टेंबर २०२५ मध्ये संगीतकार आनंद ओक यांच्यासोबत घटस्फोट घेऊन वेगळी झाली होती. पण घटस्फोटानंतर अवघ्या तीनच महिन्यांत शुभांगीने पुन्हा एकदा संसाराची गाठ बांधली आहे!
advertisement
3/10
शुभांगी सदावर्तेने 'प्रेमाची गोष्ट' या लोकप्रिय मालिकेचे निर्माता सुमित म्हशीलकर यांच्याशी विवाह केला आहे. त्यांच्या लग्नाचा चोरीछुपे पार पडलेला सोहळा आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
advertisement
4/10
शुभांगी आणि सुमित यांच्या लग्नाची बातमी त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यामुळे समोर आली. शुभांगीची 'संगीत देवबाभळी' नाटकातील सहकलाकार मानसी जोशी हिने नुकतीच एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली.
advertisement
5/10
या फोटोमध्ये शुभांगी आणि सुमित राजेशाही सिंहासनावर बसलेले दिसत आहेत. मानसीने या स्टोरीवर 'Just Married' चा स्टिकर जोडला असून नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
6/10
शुभांगीच्या दुसऱ्या लग्नाची चाहूल काही दिवसांपूर्वीच लागली होती. काही दिवसांपूर्वी शुभांगी आणि सुमितच्या मित्र-मंडळींनी त्यांच्यासाठी खास केळवणाचे आयोजन केले होते. या केळवणाचे व्हिडिओ दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केले होते.
advertisement
7/10
शुभांगीने व्हिडिओ शेअर करताना 'जुळली गाठ गं' असे कॅप्शन दिले होते, तर सुमितने 'नवराई माझी नवसाची' असे कॅप्शन लिहून मित्रांचे आभार मानले होते. तेव्हाच हे दोघे लवकरच दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
advertisement
8/10
करोना काळात शुभांगी आणि संगीतकार आनंद ओक यांचे पहिले लग्न झाले होते. आनंद ओकने सप्टेंबर २०२५ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट करत घटस्फोटाची माहिती दिली होती.
advertisement
9/10
त्यांनी लिहिले होते की, "आम्ही काही वर्षांपूर्वीच वेगळे झालो होतो, पण आता जाहीर करण्याची योग्य वेळ आहे. एकत्र घालवलेल्या क्षणांबद्दल मी कृतज्ञ आहे आणि शुभांगीच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो."
advertisement
10/10
आनंद ओक यांच्यासोबतचा संबंध संपवून, आता शुभांगी सदावर्तेने सुमित म्हशीलकरसोबत नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
घटस्फोटाच्या 90 दिवसांतच थाटला दुसरा संसार! 'देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेने गुपचूप उरकलं लग्न, पाहा पहिला फोटो