Smriti Mandhana : स्मृती मानधनाच्या हातातून एंगेजमेंट रिंग गायब, लग्न पोस्टपोन झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाची स्टार क्रिकेटपटू आणि वर्ल्ड कप विजेती खेळाडू स्मृती मानधना आणि बॉलिवूडचा म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांच लग्न काही दिवसांपूर्वीच पोस्टपोन करण्यात आलं होतं.
advertisement
1/7

टीम इंडियाची स्टार क्रिकेटपटू आणि वर्ल्ड कप विजेती खेळाडू स्मृती मानधना आणि बॉलिवूडचा म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांच लग्न काही दिवसांपूर्वीच पोस्टपोन करण्यात आलं होतं.
advertisement
2/7
स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना आलेला हार्टअटॅक आणि पलाश मुच्छलचे व्हायरल झालेल्या चॅटमुळे हे लग्न पुढे ढकलल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये बोलले जात आहे.
advertisement
3/7
दरम्यान स्मृती आणि पलाश यांच्या लग्न पोस्टपोन झाल्याच्या घटनेला आता 12 दिवस उलटून गेले आहे. यानंतर आज पहिल्यांदाज स्मृती मानधना समोर आली होती.
advertisement
4/7
स्मृती मानधनाच्या हातातली एंगेजमेंट रिंग यावेळी गायब होती. तसेच तिच्या चेहऱ्याचा रंग देखील उडाला होता आणि तिचे डोळे खूप काही सांगून जात होते.स्मृतीने शेअर केलेल्या व्हिडिओत हे सगळं स्पष्ट होत होतं.
advertisement
5/7
''आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून 12 वर्षे झाली आहेत आणि प्रत्येक वेळी आमचे मन दुखावले जायचे.संपूर्ण वर्ल्डकपमध्ये आम्ही सतत विचार करत होतो की तो क्षण (भारत कधी जिंकेल) कधी येईल.जेव्हा तो क्षण आला तेव्हा मला सतत लहान मुलासारखे वाटायचे, मी जास्त फोटो काढले नाहीत'', असे सांगत स्मृती मानधनाने वर्ल्ड विजयाच्या आठवणी सांगितल्या.
advertisement
6/7
तसेच सामन्या दरम्यान मी फलंदाजीबद्दल फारसा विचार केला नाही; मी फक्त संघाला जे हवे होते ते केले.फिल्डींग करताना मला फक्त देवाची आठवण आली.संपूर्ण 300 चेंडूंपर्यंत मी प्रार्थना करत होते, 'याची विकेट मिळाली पाहिजे, त्याची विकेट मिळाली पाहिजे,असे स्मृतीने सांगितले.
advertisement
7/7
खरं तर हा व्हिडिओ एका पेड पार्टनरशीपचा व्हिडिओ होता.या व्हिडिओमध्ये स्मृती मानधना आपल्या वर्ल्ड कप दरम्यानचा अनुभव सांगते आणि कंपनीचं प्रमोशन देखील करते. या व्हिडिओमध्ये तिने लग्न पोस्टपोन झाल्याच्या घटनेवर काही एक प्रतिक्रिया दिलेली नाही आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : स्मृती मानधनाच्या हातातून एंगेजमेंट रिंग गायब, लग्न पोस्टपोन झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलली