TRENDING:

कुछ भी करना, रोहितका इगो हर्ट मत करना! हिटमॅनचं बॉडी ट्रान्समिशन पाहून थक्क व्हाल

Last Updated:
भारताच्या वनडे टीमची कॅप्टन्सी गेल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच समोर आला आहे. सिएट अवॉर्डच्या कार्यक्रमासाठी रोहित शर्मा आला होता, पण रोहितचा फिटनेस पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
advertisement
1/7
कुछ भी करना, रोहितका इगो हर्ट मत करना! हिटमॅनचं थक्क करणारं बॉडी ट्रान्समिशन
शनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली, ज्यात रोहित शर्माऐवजी शुभमन गिलला वनडे टीमच कर्णधार करण्यात आलं. निवड समिती आणि बीसीसीआयच्या या निर्णयाला अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांनी विरोध केला.
advertisement
2/7
2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी टीमची बांधणी सुरू असल्यामुळे गिलला कर्णधार करण्यात आल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे. वनडे वर्ल्ड कपवेळी रोहित 40 वर्षांचा होईल, त्यामुळे तोपर्यंत रोहित किती फिट असेल याबाबत साशंकता आहे.
advertisement
3/7
एकीकडे रोहितच्या फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, त्याने स्वत:चा फिटनेस दाखवून अनेकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सिएट अवॉर्डच्या कार्यक्रमामध्ये रोहित शर्मा एकदम फिट दिसत आहे.
advertisement
4/7
या पुरस्कार सोहळ्यामध्ये रोहित शर्माच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत आहे. वनडे टीमची कॅप्टन्सी गेल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच समोर आला आहे.
advertisement
5/7
काहीच दिवसांपूर्वी रोहित शर्मा जिममध्ये व्यायाम करतानाही दिसला. रोहितचा मित्र आणि भारताचा माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर याच्यासोबत रोहित जिममध्ये व्यायाम करत असल्याचा फोटो समोर आला होता.
advertisement
6/7
मागच्या काही दिवसांमध्ये रोहित शर्माने तब्बल 20 किलो वजन घटवलं आहे. 95 किलो वजन असलेला रोहित शर्मा व्यायाम आणि डाएट करून 75 किलोचा झाला आहे. यासाठी रोहितने जिमसोबतच डाएट प्लानही फॉलो केला.
advertisement
7/7
वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं असलं, तरी रोहित शर्माची भारताच्या वनडे टीममध्ये निवड झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजला 19 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
कुछ भी करना, रोहितका इगो हर्ट मत करना! हिटमॅनचं बॉडी ट्रान्समिशन पाहून थक्क व्हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल