Sanju Samson : 4 मॅचनंतर चूक लक्षात आली पण आता गेम ओव्हर? ईशानच्या सेंच्युरीने बदलणार बॅटिंग लाईनअप! व्हाईस कॅप्टनचं काय होणार?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
T20 World Cup 2026 : जर संजू सॅमसन फॉर्ममध्ये परतला नाही, तर त्याला काढून टाकले जाऊ शकते आणि इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये बसवले जाऊ शकते. त्यामुळे टीम इंडियाची ओपनिंग पेअर बदलू शकते.
advertisement
1/7

आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन एका गोष्टीमुळं वाढलंय. ते म्हणजे टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन.. संजूचा आता गेम ओव्हर होणार का? अशा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
advertisement
2/7
न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेत संजू सॅमसन फक्त 46 धावा करू शकलाय. संजूची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याची सातत्य... त्याला ते टिकवता येत नाहीये.
advertisement
3/7
तर दुसरीकडे विकेटकीपर फलंदाज ईशान किशन याने 4 सामन्यांमध्ये इशान किशनने एका शतक आणि एका अर्धशतकासह 215 धावा केल्या आहेत. पाचव्या मॅचमध्ये शतक त्याने ठोकलंय.
advertisement
4/7
जर संजू सॅमसन फॉर्ममध्ये परतला नाही, तर त्याला काढून टाकले जाऊ शकते आणि इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये बसवले जाऊ शकते. त्यामुळे टीम इंडियाची ओपनिंग पेअर बदलू शकते.
advertisement
5/7
पहिल्या चार मॅचमध्ये संजू अभिषेकला नॉन स्ट्राईकला आणून पहिली स्ट्राईक घेत होता. पाचव्या मॅचमध्ये ती चूक संजूने सुधारली. त्याने अभिषेकला पहिली स्ट्राईक दिली अन् स्वत:वरचं प्रेशर कमी केलं.
advertisement
6/7
तर दुसरीकडे टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन गेम चेंजर ठरतोय. हा व्हाईस कॅप्टन दुसरा तिसरा कुणी नसून अक्षर पटेल आहे. अक्षर पटेलने अखेरच्या संधीचं सोनं केलं अन् तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या.
advertisement
7/7
दरम्यान, ज्यावेळी टीम इंडियाला विकेटची गरज होती, तेव्हाच अक्षर पटेलची फिरकी चालली अन् विकेट्स मिळाल्या. त्यामुळे आता वॉशिंग्टन सुंदरचं कमबॅकनंतर काय होणार? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Sanju Samson : 4 मॅचनंतर चूक लक्षात आली पण आता गेम ओव्हर? ईशानच्या सेंच्युरीने बदलणार बॅटिंग लाईनअप! व्हाईस कॅप्टनचं काय होणार?