Asia Cup : 'रायजिंग स्टार'चा पाकिस्तानसमोर फुसका बार, वैभव-आयुष आशिया कप फायनलमध्ये तोंडावर आपटले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कप अंडर-19 च्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचे पुढचे सुपरस्टार तोंडावर आपटले आहेत.
advertisement
1/7

वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या दोन्ही खेळाडूंकडे टीम इंडियाचे पुढचे स्टार म्हणून पाहिलं जात आहे, पण पुन्हा एकदा दोघेही अपयशी ठरले आहेत.
advertisement
2/7
पाकिस्तानने दिलेल्या 348 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बॅटिंगला आलेला कर्णधार आयुष म्हात्रे 7 बॉलमध्ये 2 रनवर आऊट झाला, तर वैभव सूर्यवंशी 10 बॉलमध्ये 26 रन करून माघारी परतला.
advertisement
3/7
अंडर-19 आशिया कप स्पर्धेत आयुष म्हात्रेला 5 इनिंगमध्ये फक्त 65 रन करता आले. अंडर-19 आशिया कपच्या 5 सामन्यांमध्ये आयुष म्हात्रेने 4, 38, 14, 7 आणि 2 रन केले. तर दुसरीकडे वैभव सूर्यवंशीने स्पर्धेची सुरूवात धमाक्यात केली, पण त्याला मोक्याच्या क्षणी मोठा स्कोअर करता आला नाही.
advertisement
4/7
युएईविरुद्ध वैभवने 95 बॉलमध्ये 171 रनची वादळी खेळी केली, त्यानंतर मलेशियाविरुद्ध वैभवने 19 बॉलमध्ये 50 रन केले. पाकिस्तानविरुद्धच्या ग्रुप स्टेजच्या सामन्यात वैभव 5 रनवर आऊट झाला आणि आता फायनलमध्ये वैभवला 26 रन करता आले.
advertisement
5/7
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार आयुष म्हात्रेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये 347/8 पर्यंत मजल मारली. समीर मिन्हासने 113 बॉलमध्ये 172 रनची खेळी केली. तर अहमद हुसेनने 56 रन केले.
advertisement
6/7

7/7
भारताकडून दीपेश देवेंद्रनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर हेनिल पटेल आणि खिलान पटेलला 2-2 विकेट मिळाल्या. याशिवाय कनिष्क चौहानलाही 1 विकेट घेण्यात यश आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Asia Cup : 'रायजिंग स्टार'चा पाकिस्तानसमोर फुसका बार, वैभव-आयुष आशिया कप फायनलमध्ये तोंडावर आपटले!