TRENDING:

BSF Sports Quota Bharti 2025: देशसेवा करण्याची मोठी संधी! नोकर भरतीसाठी कसा कराल अर्ज?

Last Updated:
सीमा सुरक्षा दलामध्ये (Border Security Force) नोकर भरतीची संधी आहे. सीमा सुरक्षा दलामध्ये, कॉन्स्टेबल GD (खेळाडू- Sports Quota) पदासाठी नोकरभरती केली जात आहे. कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदासाठी बंपर भरती केली जात आहे. 549 पदांसाठी ही भरती केली जात असून इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकणार आहेत.
advertisement
1/6
देशसेवा करण्याची मोठी संधी! नोकर भरतीसाठी कसा कराल अर्ज?
सीमा सुरक्षा दलात म्हणजेच, Border Security Force मध्ये नोकर भरतीची संधी आहे. सीमा सुरक्षा दलामध्ये, कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदासाठी नोकरभरती केली जात आहे. कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदासाठी बंपर भरती केली जात आहे. 549 पदांसाठी ही भरती केली जात असून इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकणार आहेत.
advertisement
2/6
अलीकडेच कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदासाठीची नोकर भरती जाहीर करण्यात आली असून 27 डिसेंबर 2025 पासून अर्ज भरण्यासाठी सुरूवात होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने नोकर भरती होणार असून 15 जानेवारी 2026 रोजी इच्छुक उमेदवार रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्ज करु शकणार आहेत.
advertisement
3/6
उमेदवाराने 01 ऑगस्ट 2025 पर्यंत आपले वय 18 ते 23 वर्षापर्यंत पूर्ण केलेले असायला हवे. अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांसाठी 05 वर्षे आणि इतर मागासवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांसाठी वयामध्ये सूट असेल. संपूर्ण भारतात कुठेही उमेदवारांसाठी नोकरीचं ठिकाण असेल. सीमा सुरक्षा दलात नोकरी करण्यासाठी काही शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक आहे.
advertisement
4/6
इच्छुक उमेदवार 10वी उत्तीर्ण आणि संबंधित खेळात पात्र असावा. त्या खेळाचे उमेदवाराला ज्ञान असावं. कोणकोणत्या खेळाचे ज्ञान आवश्य आहे, याची माहिती उमेदवारांना जाहिरातीत मिळेल. अद्याप ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरूवात झालेली नाही, अर्ज भरण्याची सुरूवात 27 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. बातमीमध्ये जाहिरातीची लिंक देण्यात आली आहे.
advertisement
5/6
अर्ज भरण्याची पद्धत ऑनलाईन असून अर्जाची फी सुद्धा भरण्याची पद्धत ऑनलाईनच असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी आणि इतर मागासवर्गातील उमेदवारांसाठी 159 रूपये इतकी फी असणार आहे. तर, अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना आणि महिला उमेदवारांना फी भरायची नाही. त्यांच्यासाठी मोफत आहे.
advertisement
6/6
कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदासाठी लेव्हल 3 प्रमाणे मासिक वेतन असेल. 21,700 ते 69,100 पर्यंत मासिक वेतन असेल. शिवाय यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार पगार आणि इतर भत्ते मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
BSF Sports Quota Bharti 2025: देशसेवा करण्याची मोठी संधी! नोकर भरतीसाठी कसा कराल अर्ज?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल