रोहित-विराटची रिटायरमेंट, पण T20 वर्ल्ड कप खेळलेल्या 5 जणांना No Entry, हिटमॅनला बनवलं होतं चॅम्पियन!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिल आणि जितेश शर्मा यांना टीममधून बाहेर करण्यात आलं आहे, तर इशान किशन आणि रिंकू सिंग यांची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे.
advertisement
1/9

शुभमन गिल हा मागच्या काही काळापासून टी-20 क्रिकेटमध्ये संघर्ष करत होता. मागच्या 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गिलच्या बॅटमधून एकही अर्धशतक आलं नव्हतं, त्यामुळे अखेर गिलला वर्ल्ड कपच्या टीममधून डच्चू देण्यात आला.
advertisement
2/9
याआधी 2024 ला झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला, पण या वर्ल्ड कप विजेत्या टीममधले 7 खेळाडू यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाहीत.
advertisement
3/9
रोहित शर्माने भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. फायनल जिंकल्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये रोहितने निवृत्तीची घोषणा केली. रोहित शर्मा हा यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपचा ब्रॅन्ड ऍम्बेसेडर आहे.
advertisement
4/9
रोहितसोबतच विराट कोहलीनेही टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार नाही.
advertisement
5/9
विराट कोहली आणि रोहित शर्माप्रमाणेच टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. जडेजानेही मागच्या टी-20 वर्ल्ड कप फायनलनंतर रिटायरमेंटची घोषणा केली होती. मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये जडेजाला 5 इनिंगमध्येच बॅटिंग मिळाली, यात त्याने 35 रन केले, तसंच 8 मॅचमध्ये त्याला फक्त एक विकेट मिळाली.
advertisement
6/9
यशस्वी जयस्वाल 2024 टी-20 वर्ल्ड कपच्या भारतीय टीममध्ये होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, कारण रोहित आणि विराटने ओपनिंगला बॅटिंग केली. या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाने अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन या तीन ओपनरना संधी दिली आहे.
advertisement
7/9
2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऋषभ पंत हा टीम इंडियाचा विकेट कीपर होता, पण यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पंतला टीममध्ये जागा मिळाली नाही. ऋषभ पंतची टी-20 क्रिकेटमधली मागच्या काही काळातली कामगिरी निराशाजनक झाली होती, त्यामुळे तो सध्या टी-20 टीममधून बाहेर आहे.
advertisement
8/9
युझवेंद्र चहलही 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममध्ये होता, पण त्याला एकाही सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नव्हती. मागच्या टी-20 वर्ल्ड कपनंतर चहल भारतीय टीममधून बाहेर गेला. अजूनपर्यंत त्याला भारतीय टीममध्ये कमबॅक करता आलेलं नाही.
advertisement
9/9
2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद सिराज ग्रुप स्टेजच्या 3 मॅचमध्ये खेळला, यात त्याला आयर्लंडविरुद्ध फक्त एक विकेट मिळाली, पण त्याने फार रनही दिल्या नाहीत. ग्रुप स्टेजनंतरच सिराज टीममधून बाहेर झाला आणि कुलदीप यादवला संधी दिली गेली. मोहम्मद सिराजला यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळालेलं नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
रोहित-विराटची रिटायरमेंट, पण T20 वर्ल्ड कप खेळलेल्या 5 जणांना No Entry, हिटमॅनला बनवलं होतं चॅम्पियन!