Team India : रोहित अन् टीम इंडियाला पाहण्यासाठी मरीन ड्राईव्हवर मुंग्यांसारखी गर्दी; पहिले Photo समोर
- Published by:Shreyas
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय झाल्यानंतर भारतीय खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईमध्ये थोड्याच वेळात भारतीय खेळाडूंच्या रोड शो ला सुरूवात होणार आहे. यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात तुडूंब गर्दी उसळली आहे.
advertisement
1/8

टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया भारतात पोहोचली आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन खेळाडू मुंबईमध्ये आले आहेत. मुंबईमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा रोड शो होणार आहे.
advertisement
2/8
वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या खेळाडूंना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. भर पावसामध्ये मुंबईचे रस्ते गर्दीने तुडुंब भरले आहेत.
advertisement
3/8
मरिन ड्राईव्ह परिसरामध्ये भारतीय क्रिकेट चाहते हातात तिरंगा आणि टीम इंडियाची जर्सी घालून विश्वविजेत्या खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
advertisement
4/8
मरिन ड्राईव्ह परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे ट्रॅफिकही झाला आहे. सुरक्षेसाठी मरिन ड्राईव्ह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
advertisement
5/8
मरीन ड्राईव्हच्या क्वीन्स नेकलेसवर भर पावसामध्ये जनसागर उसळला आहे. लहान मुलांपासून तरुण ते वृद्धांपर्यंत महिला-पुरुष सगळेच वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला पाहण्यासाठी आले आहेत.
advertisement
6/8
नरिमन पॉईंट ते मरीन ड्राईव्ह परिसर आणि मग वानखेडे स्टेडियम असा टीम इंडियाच्या खेळाडूंचा रोड शो निघणार आहे. या रोड शोनंतर वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
advertisement
7/8
वानखेडे स्टेडियमवरही चाहत्यांची मोठ्या प्रमाणावार गर्दी उसळली आहे. अवघ्या पाच ते सहा मिनिटांमध्ये वानखेडे स्टेडियम हाऊसफुल झालं आहे.
advertisement
8/8
वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयकडून टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 रननी पराभव केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : रोहित अन् टीम इंडियाला पाहण्यासाठी मरीन ड्राईव्हवर मुंग्यांसारखी गर्दी; पहिले Photo समोर