TRENDING:

विराटने 2 वेळा प्रेमानं समजवलं पण ऐकतोय तो यशस्वी कसला! जयस्वालने चौथ्या बॉलवर माती खाल्लीच

Last Updated:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे.
advertisement
1/7
विराटने प्रेमानं समजवलं पण ऐकतोय तो यशस्वी कसला! चौथ्या बॉलवर माती खाल्लीच
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे.
advertisement
2/7
साउथ आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावण्यात हा भारताचा सलग 20 वा पराभव आहे. टॉस जिंकल्यानंतर साउथ आफ्रिकेने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
advertisement
3/7
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल भारतीय डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आले आहेत. जयस्वालने नांद्रे बर्गरच्या षटकाचे चौकार मारून स्वागत केले. षटकही चौकाराने संपले. पहिल्या षटकात टीम इंडियाने 14 धावा केल्या.
advertisement
4/7
भारताने डावाची सुरुवात केली पण पहिलीच विकेट रोहित शर्माच्या स्वरूपात पडली. रोहितने 8 बॉल्समध्ये 14 रन्स काढून आउट झाला. भारताची पहिलीच विकेट खूप स्वस्तात पडली.
advertisement
5/7
यानंतर मैदानात विराट कोहली आला. कोहलीला भागीदार म्हणून यशस्वी होता. पण मोठे शॉट्स खेळण्याच्या नादात यशस्वीची पण विकेट पडली. भारताने कमी वेळात दुसरीही विकेट गमावली.
advertisement
6/7
यशस्वी खेळत असताना, त्याने मोठे शॉट्स खेळायचा प्रयत्न केला पण त्यात त्याला यश मिळत नसल्याचं दिसून आलं. यावेळी, ओव्हरच्या मध्ये विराटने त्याला स्थिर खेळण्याचा सल्ला देखील दिला.
advertisement
7/7
यशस्वी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचा हा प्रयत्न दोन वेळा फसला, त्यावेळी विराटने त्याला स्ट्रेट खेळण्यास सांगितलं. जेव्हा केशव महाराज बॉलिंगला आला तेव्हा त्याने परत तीच चूक केली आणि बाद झाला. मार्को जॅनसेनने त्याची कॅच घेतली आणि 10 व्या ओव्हरमध्ये 22 रन्स काढून जयस्वाल पॅव्हेलियनमध्ये परतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
विराटने 2 वेळा प्रेमानं समजवलं पण ऐकतोय तो यशस्वी कसला! जयस्वालने चौथ्या बॉलवर माती खाल्लीच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल