TRENDING:

Team India Jersey : टीम इंडियाच्या जर्सीचा रंग निळा का? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर!

Last Updated:
मागच्या काही वर्षांपासून आपण भारतीय क्रिकेट टीमला निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये पाहत आहोत, पण टीम इंडियाच्या जर्सीचा रंग निळा का असतो? बऱ्याच जणांना याचं उत्तर माहिती नाही.
advertisement
1/7
टीम इंडियाच्या जर्सीचा रंग निळा का? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर!
भारतीय क्रिकेट चाहते लहानपणापासूनच टीम इंडियाला निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये पाहत आहेत. मागच्या काही वर्षात टीम इंडियाच्या जर्सीमध्ये बदल झाले, कधी जर्सीचा रंग गडद निळा तर कधी हलका निळा झाला, पण जर्सीमधला निळा रंग कायम राहिला. यासाठी टीम इंडियाला मेन इन ब्लू म्हटले जाते.
advertisement
2/7
फक्त क्रिकेटच नाही तर भारताची फुटबॉल टीम आणि हॉकीसह इतर खेळांमधील टीमही निळ्या रंगाच्या जर्सी घालून मैदानात उतरतात. पण टीम इंडियाच्या जर्सीचा रंग निळा का असतो? याबाबत अनेकांना माहिती नाही.
advertisement
3/7
हॉकी, फुटबॉल आणि इतर खेळांमध्ये राष्ट्रीय टीमचे खेळाडू पांढऱ्या किंवा पिवळ्या जर्सीमध्ये खेळले आहेत. पण 1980 च्या दशकात भारतामध्ये क्रिकेटला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर इतर खेळांच्या राष्ट्रीय टीमनीही क्रिकेट टीमप्रमाणेच निळ्या रंगाची जर्सी घालायला सुरूवात केली.
advertisement
4/7
टीम इंडियाची जर्सी निळ्या रंगाची असण्याचं कारण म्हणजे निळा रंग भारताच्या राष्ट्रीय ध्वजासोबत सुसंगत असल्याचंही सांगण्यात येतं.
advertisement
5/7
पण या याबाबतही दावे प्रतिदावे आहेत, कारण भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये भगवा, पांढरा आणि हिरवा रंगही आहे. मग हे तीन रंग टीम इंडियाच्या जर्सीसाठी का वापरले जात नाहीत?
advertisement
6/7
वनडे क्रिकेटमध्ये रंगीत जर्सी अनिवार्य आहे. शिवाय पांढरी जर्सी आधीच टेस्ट क्रिकेटमध्ये वापरली जाते. भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये असलेल्या अशोक चक्राचा रंग निळा आहे, जो टीम इंडियाच्या जर्सीसोबत सुसंगत आहे.
advertisement
7/7
1985 साली केरी पॅकरने ऑस्ट्रेलियात वर्ल्ड सीरिज क्रिकेटला सुरूवात केली. तेव्हा रात्रीचे सामना, पांढरा बॉल तसंच रंगीत कपडे वापरायला सुरूवात झाली. तेव्हा भारताने अशोक चक्राच्या रंगासोबत सुसंगत असलेला निळा रंग जर्सीसाठी निवडला. यानंतर 1985 च्या बेन्सन ऍन्ड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ क्रिकेटमध्ये भारतीय टीमने पहिल्यांदा निळी जर्सी घातली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India Jersey : टीम इंडियाच्या जर्सीचा रंग निळा का? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल