विराट कोहली देतोय मेस्सी, रोनाल्डोला टक्कर, फुटबॉलवेड्या शहरात क्रिकेटचा फिव्हर
- Published by:News18 Marathi
Last Updated:
क्रीडा क्षेत्राचा विचार करता कोल्हापूर हे कुस्तीसोबत फुटबॉलसाठीही प्रसिद्ध आहे. मात्र याच कोल्हापुरात आता क्रिकेट फिव्हर दिसतोय.
advertisement
1/7

<a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूर</a> म्हटलं की लाल मातीतील कुस्ती आठवते. पण 'क्रिकेटवेड्या भारत देशात फुटबॉलवेडं शहर' अशी कोल्हापूरची एक विशेष ओळख आहे.
advertisement
2/7
फुटबॉल हा अवघ्या कोल्हापूरकरांचा सर्वात आवडता खेळ आहे. त्यामुळेच लिओनेल मेस्सी, रोनाल्डो यांची क्रेझ कोल्हापुरात नेहमीच दिसते. तसेच त्यांचे मोठेमोठे होर्डिंगही दिसतात.
advertisement
3/7
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेवेळी तर कोल्हापूरकरांनी नानाविध प्रकारे आपले फुटबॉल प्रेम व्यक्त केले होते. त्याची देशभर चर्चाही होत असते.
advertisement
4/7
कोल्हापुरात कुणी मेस्सी समर्थकांनी फुटबॉलपटू मेस्सीचे उंचच उंच कट आऊट लावले होते. तर कोणी रोनाल्डोचे कट आऊट लाऊन आपले फुटबॉलप्रेम व्यक्त केले होते.
advertisement
5/7
भारतात विश्वचषक सामने सुरू असताना या फुटबॉल वेड्या शहरातही क्रिकेटचा फिव्हर दिसत आहे. येथील काही क्रिकेटप्रेमींनी मेस्सी, रोनाल्डो प्रमाणेच विराट कोहलीचे 15 फुटी कट आऊट उभारले आहे.
advertisement
6/7
कोल्हापुरातील विराट कोहलीच्या चाहत्यांनी निवृत्ती चौक परिसरात कोहलीचा 15 फुटांचा कटआउट उभारला आहे. कै. राणा गायकवाड स्पोर्ट्स यांच्या वतीने हा कटआऊट उभारण्यात आला आहे.
advertisement
7/7
यंदाचा क्रिकेट विश्वचषक जिंकून भारतीय संघाने 2011 ची पुनरावृत्ती करावी, यासाठी हा कटआउट उभारून भारतीय संघाला शुभेच्छा देण्यात आल्याचे क्रिकेटप्रेमींनी सांगितले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
विराट कोहली देतोय मेस्सी, रोनाल्डोला टक्कर, फुटबॉलवेड्या शहरात क्रिकेटचा फिव्हर