TRENDING:

Success Story: मेंटल मंकी म्हणून सगळ्यांनी चिडवलं, गावकऱ्यांनी ठरवलं शापित! देशासाठी मेडल मिळवून दाखवलं अन् झाली कोट्याधीश

Last Updated:
दीप्ती जीवांजीने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक जिंकले. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी तिचा गौरव केला. तिच्या संघर्षाने देशाला अभिमान मिळवून दिला.
advertisement
1/8
गावकऱ्यांनी ठरवलं शापित! देशासाठी मेडल मिळवून दाखवलं अन् झाली कोट्याधीश
सूर्यग्रहणादिवशी जन्म झाला, ओठ फाटलेल्या अवस्थेत आणि नाकही विचित्र, दिसायला देखणी नसल्याने तिला गावकऱ्यांनी सतत चिडवलं. सूर्यग्रहणादिवशी जन्म झाल्याने शापित ठरवलं. कित्येक रात्र तिने स्वत: रडून काढली, मात्र तिने हार मानली नाही. आई तिच्या पाठीशी खंबीर उभी राहिली आणि तिने ही लढाई लढली. एक वेळ अशी होती की तिला शापित म्हणून मेंटल मंकी म्हणून डिवचलं जात होतं आज तीच लोक तिचं कौतुक करत आहेत.
advertisement
2/8
भारताची महिला पॅरा-अ‍ॅथलीट दीप्ती जीवांजी हिने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक जिंकून भारताचं नाव उज्ज्वल केलं. दीप्तीच्या या अविश्वसनीय कामगिरीमुळे आज संपूर्ण देश तिच्यावर गर्व करत आहे. महिलांच्या ४०० मीटर टी२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने ५५.८२ सेकंदांत ही शर्यत पूर्ण करत भारताला १६ वे पदक मिळवून दिले.
advertisement
3/8
एका असामान्य परिस्थितीतून आलेल्या मुलीनं मिळवलेल्या यशाबद्दल तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी तिचा यथोचित गौरव केला आहे. दीप्ती जीवांजी पॅरिसहून मायदेशी परतल्यानंतर लगेचच तिने मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी तिच्या या महान कामगिरीसाठी एक कोटी रुपये रोख पुरस्कार, वारंगल येथे ५०० चौरस यार्ड जमीन आणि ग्रुप २ सेवेमध्ये एक योग्य सरकारी पद देण्याची मोठी घोषणा केली आहे.
advertisement
4/8
दीप्तीच्या यशात मोलाचा वाटा असलेल्या तिचे प्रशिक्षक (आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते) एन. रमेश यांनाही मुख्यमंत्र्यांनी १० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. दीप्तीच्या जन्मापासूनच तिच्या आयुष्यात मोठे आव्हान होते. आंध्र प्रदेशातील वारंगल जिल्ह्यातील कल्लेडा गावात तिचा जन्म झाला, आणि ती बौद्धिक विकलांगता घेऊन जन्माला आली होती. बालपणी तिचे डोके मोठे होते, तसेच नाक आणि ओठही असमान्य होते. त्यामुळे गावातील लोक तिला हिणवायचे.
advertisement
5/8
जेव्हा जेव्हा गावकऱ्यांनी तिला चिडवले, तेव्हा तेव्हा ती घरी येऊन आपली आई जीवांजी धनलक्ष्मी यांच्यासमोर खूप रडायची. तिची आई तिला सांत्वन द्यायची. काही लोकांनी तिच्या आईला 'मुलीला अनाथालयात पाठवा' असा सल्लाही दिला होता, पण एक आई आपल्या काळजाच्या तुकड्याला दूर ठेवू शकत नाही, या मायेच्या बंधामुळे आईने तिला कधीच सोडले नाही.
advertisement
6/8
दीप्तीच्या आईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांची मुलगी फार कमी बोलायची. मात्र, जीवनातील इतक्या मोठ्या आव्हानांना तोंड देत असतानाही दीप्तीने कधीही हार मानली नाही. तिच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची प्रचंड इच्छाशक्ती होती. याच इच्छाशक्तीच्या बळावर ती आज पॅरिसमधून पदक घेऊन परतली आहे.
advertisement
7/8
दीप्तीसाठी हे यश आणखी खास आहे, कारण ती पहिल्यांदाच पॅरालिम्पिकमध्ये खेळायला गेली होती. विशेष म्हणजे, यापूर्वी तिने जपानमध्ये झालेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स पॅरा चॅम्पियनशिपमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. दीप्ती जीवांजीने आपल्या संघर्षातून हे सिद्ध केले आहे की, जर तुमच्यात दृढ इच्छाशक्ती असेल, तर जगात कोणतेही आव्हान तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही.
advertisement
8/8
ज्या समाजाने तिला हिणवले, त्याच समाजात तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा अभिमानाने फडकवला. शारीरिक किंवा बौद्धिक मर्यादा असतानाही तिने मिळवलेले हे पदक आज लाखो लोकांच्या संघर्षासाठी एक प्रेरणास्रोत बनले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
Success Story: मेंटल मंकी म्हणून सगळ्यांनी चिडवलं, गावकऱ्यांनी ठरवलं शापित! देशासाठी मेडल मिळवून दाखवलं अन् झाली कोट्याधीश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल