TRENDING:

Success story IPS D. Roopa : 18 वर्षांचं करियर, 40 बदल्या, भल्याभल्या गुंडांनाही फुटतो घाम, कोण आहे लेडी सिंघम रुपा दिवाकर मौदगिल?

Last Updated:
Success story IPS D. Roopa: हे तुला जमणार नाही! असं म्हणणाऱ्यांना रुपा यांनी चपराक आपल्या यशातून दाखवून दिली, त्यांच्या उत्तम कामाच्या बदल्यात त्यांच्या हातावर ट्रान्सफरची नोटीस येते, मात्र त्या याला संधी म्हणून आजही पाहतात....
advertisement
1/9
18 वर्षांचं करियर,40 बदल्या,भल्याभल्या गुंडांनाही फुटतो घाम, लेडी सिंघम रूपा डी?
शाळेतच डोक्यात पक्क झालं होतं आपल्याला काय करायचं, त्यामुळे त्या दिशेनं आपसूकच पावलं उचलली गेली. समाजाने दबाव आणला मात्र आई वडील खंबिरपणे पाठीशी उभे राहिले. हे शब्द आहेत रुपा मौदगिल यांचे. २००० च्या बॅचची आयपीएस अधिकारी. रुपा यांच्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या ४० वेळा बदल्या झाल्या आहेत, त्याचा अजिबात पश्चाताप नाही असं म्हणतात.
advertisement
2/9
जर माझ्या आई-वडिलांनी मला 'तू मुलगी आहेस, पोलीस अधिकारी होऊ नको' असं सांगितलं असतं, तर मी आज तुमच्यासमोर आयपीएस म्हणून उभी राहू शकले नसते असं रुपा म्हणतात. कर्नाटकच्या एका छोट्या दावणगेरे गावात त्यांचा जन्म झाला. आई वडिलांची चांगली नोकरी होती. त्यांनी माझ्या पंखांना बळ दिलं, समाजाने अनेक टोमणे आई वडिलांनाही ऐकवलं.
advertisement
3/9
रुपा यांनी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, जेव्हा मी आयपीएस झाले, तेव्हा माझ्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना विचारले होते की त्यांनी मुलीला पोलीस दलात कसे काय जाऊ दिले? पण माझ्या पालकांची विचारसरणी नेहमीच प्रगतीशील होती. माझ्या वडिलांनीच मला हे स्वप्न दाखवले. त्यांनी सांगितले की तू आयएएस किंवा आयपीएस हो. तेव्हा माझ्या तिसऱ्या इयत्तेतील शिक्षिकेला मी दिलेले हेच उत्तर होते, ज्यामुळे सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या. त्याच क्षणी माझ्या मनात 'आयपीएस' काहीतरी खास आहे, हे बिंबलं होतं.
advertisement
4/9
एनसीसीमध्ये खूप सक्रिय होते आणि त्यामुळे खाकी वर्दीचा माझ्यावर खूप प्रभाव होता. आठवी ते बारावीपर्यंत मी एनसीसीमध्ये होते आणि रिपब्लिक डे स्पेशल कॅम्पसाठी मी अनेक परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या. नववीत असताना दिल्लीतल्या याच कॅम्पमध्ये किरण बेदी यांचे भाषण झाले आणि त्यातून नवी प्रेरणा मिळाली. याच काळात मला स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी 'कॉम्पिटिशन सक्सेस' मासिक मिळाले, ज्यात आयएएस/आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलाखती वाचायला मिळाल्या. यातून मला परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासाच्या विषयांची स्पष्ट कल्पना आली.
advertisement
5/9
या सगळ्यानंतर मनाशी खूणगाठ बांधली मानसशास्त्र आणि समाजशास्त्र घेऊन मी यूपीएससीची परीक्षा देईन. दहावीच्या बोर्ड परीक्षेत मी २३ वी रँक मिळवूनही विज्ञान शाखा न निवडता ११ वी मध्ये कला शाखा निवडली, तेव्हा अनेकांना धक्का बसला होता, पण मी माझ्या स्वप्नांनुसार आणि आवडीनुसार निवड केली, यूपीएससीमध्ये ४३ वी रँक मिळवूनही मी आयपीएस निवडला. मी अवघी २४ वर्षांची असताना माझ्या कारकिर्दीची सुरुवात एका मोठ्या आव्हानाने झाली.
advertisement
6/9
धारवाडमध्ये माझ्या पहिल्याच महिन्यात मला तत्कालीन मुख्यमंत्र्यांविरुद्ध न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंटवर कारवाई करावी लागली. त्यानंतर यादगिरी येथे जिल्ह्याची पहिली प्रमुख म्हणून काम करताना, नवजात जिल्ह्याचा कारभार सांभाळण्यासारखे आव्हान माझ्यासमोर होते. माझ्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत ४० वेळा बदल्या झाल्या, पण मी बदल्यांना कधीच शिक्षा मानले नाही.
advertisement
7/9
बिदरमध्ये कार्यरत असताना एका विद्यमान आमदाराविरुद्ध दंगल भडकावल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याच्या कारवाईआधीच माझी बदली झाली आणि मला हक्कभंग नोटीस मिळाली, पण कायद्याच्या दृष्टीने मी योग्य असल्यामुळे अखेर विजय झाला.
advertisement
8/9
माझ्या धडाकेबाज कारवाईमुळे माझ्या बदल्या होत गेल्या, मात्र मी योग्य असल्याने अखेर सत्याचा विजय झाला. या दरम्यान बदनामी करण्याचाही प्रयत्न झाला. बदनामीची नोटीस देखील मिळाली. मात्र या सगळ्या परिस्थितीला शांतपणे सामोरी गेले. मी नेहमीच पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने काम केले आहे आणि ही लढण्याची योग्य कारणे आहेत.
advertisement
9/9
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर तुमची मुलगी असेल, तर तिला नक्की प्रोत्साहन द्या. माझ्या वडिलांनी मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला (जी आता आयआरएस अधिकारी आहे) पाठिंबा दिला म्हणून आम्ही हे स्थान मिळवू शकलो. युवकांना माझा संदेश आहे: जे बनायचे आहे त्याचे स्वप्न बघा, त्याची कल्पना करा आणि ते साध्य करण्यासाठी पुढे चला. लोक म्हणतील 'हे तुझ्या आवाक्याबाहेरचे आहे', पण कोणालाही घाबरू नका. अडचणी येतील, पण मागे हटू नका. धैर्याने तोंड द्या आणि फक्त 'जे योग्य आहे' तेच करत राहा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
Success story IPS D. Roopa : 18 वर्षांचं करियर, 40 बदल्या, भल्याभल्या गुंडांनाही फुटतो घाम, कोण आहे लेडी सिंघम रुपा दिवाकर मौदगिल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल