Success Story: वडिलांचा नकार प्रसंगी रिजेक्शनही पचवलं, हार मानली नाही, गली बॉयचा मोईन कसा बनला बॉलिवूडचा स्टाईल आयकॉन
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Success Story: विजय वर्मा हैदराबादमधून अभिनयाच्या स्वप्नासाठी FTII पुणे गाठलं, वडिलांचा विरोध पत्करला. 'पिंक', 'गली बॉय', 'डार्लिंग्स'मधून बॉलिवूडचा स्टाईल आयकॉन बनला.
advertisement
1/8

मेथड अॅक्टिंगचा किंग म्हणून सध्या विजय वर्माकडे पाहिलं जातं. सध्या त्यांच्याकडे कामं कमी नाहीत, पण एक काळ असा होता की ऑडिशन देऊनही त्यांना फक्त रिजेक्शनच मिळत होतं. हैदराबादमधील एका सर्वसामान्य कुटुंबात २९ मार्च १९८६ रोजी जन्म घेतलेल्या विजयने लहानपणापासूनच ॲक्टर व्हायचं होतं. मात्र, त्यांच्या या स्वप्नाला कुटुंबाचा पाठिंबा नव्हता, विशेषतः त्यांच्या वडिलांचा. त्यामुळे त्यांनी कुटुंबापासून आपले स्वप्न लपवून अनेक लहान-मोठ्या नोकऱ्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं मन अभिनयाकडेच ओढलं जात होतं.
advertisement
2/8
आपल्या अभिनयाच्या ध्येयासाठी विजयने हैदराबादमध्ये थिएटर ग्रूप जॉईन केला. याच दरम्यान त्यांना FTII, पुणेच्या जाहिरातीबद्दल माहिती मिळाली. पहिल्या प्रयत्नात निवड झाली नाही, पण त्यांनी हार मानली नाही. दुसऱ्यांदा फॉर्म भरला आणि त्यांची निवड झाली. आता वेळ होती घर सोडून दोन वर्षांसाठी पुणे गाठण्याची. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की विजयने अभिनय न करता कुटुंबाचा व्यवसाय सांभाळावा.
advertisement
3/8
विजयच्या या निर्णयाला त्यांचा विरोध होता. वडील बाहेर असताना, आईच्या पाठिंब्याने त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. जाताना त्यांनी वडिलांना फोन केला, तेव्हा वडिलांनी नाराजी व्यक्त करत 'मी घरी परत येण्याआधी तू इथून निघून जा,' असं सांगितलं ही गोष्ट विजयच्या जिव्हारी लागली. वडिलांची नाराजी पत्करून विजय आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी पुण्यात आला.
advertisement
4/8
पुण्यातील FTII मध्ये दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर, विजय मायानगरी मुंबईत आला. या नव्या शहरात राहणं आणि आपलं पोट भरणं त्यांच्यासाठी सोपं अजिबात नव्हतं. पण, स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीमुळे त्याने प्रत्येक संकटाचा सामना केला. अभिनय क्षेत्रात संधी मिळवण्यासाठी त्यांनी खूप ऑडिशन्स दिल्या, पण हवं असलेलं यश मिळत नव्हतं. याच काळात त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली.
advertisement
5/8
याच नाटकांदरम्यान अनेक कास्टिंग डायरेक्टर्सची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. विजयने आपल्या करिअरची सुरुवात 'शोर' नावाच्या एका शॉर्ट फिल्मने केली. पण, मनोज बाजपेयी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबतच्या 'चित्तागोंग या चित्रपटातील 'झुंकू' नावाच्या भूमिकेने त्यांना पहिला ब्रेक मिळाला.
advertisement
6/8
यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या, पण २०१६ मध्ये आलेला 'पिंक हा चित्रपट त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला. यात त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासारख्या महानायकासोबत काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटात त्यांची भूमिका नकारात्मक असली तरी त्यांनी आपल्या अभिनयाने त्यात जीव ओतला.
advertisement
7/8
त्यानंतर 'गली बॉय'मधील 'मोईन'च्या भूमिकेने त्यांच्या करिअरला नवी भरारी मिळाली आणि ते प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. आज विजय वर्मा आपल्या करिअरच्या शिखरावर आहेत. 'बागी 3', 'डार्लिंग्स', आणि 'दहाड' सारख्या कलाकृतींमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.
advertisement
8/8
एकेकाळी कामासाठी रिजेक्शन मिळणारा आता बॉलिवूडचे 'स्टाईल आयकॉन' बनला. आज त्याच्याकडे कामंही खूप आहेत आणि पैसाही, मात्र सुरुवातीच्या काळात वडिलांचा विरोध पत्करुन घर सोडून येणं आणि वडिलांना स्वत:ला सिद्ध करुन दाखवणं हा संघर्ष विजयसाठी खूप मोठा होता. त्याच्या आईनं त्याला या सगळ्यात मोलाची साथ दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
Success Story: वडिलांचा नकार प्रसंगी रिजेक्शनही पचवलं, हार मानली नाही, गली बॉयचा मोईन कसा बनला बॉलिवूडचा स्टाईल आयकॉन