कॉल स्क्रीन अचानक बदलली? मग तुमचा फोन हॅक तर नाही झाला ना?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कॉल करताना किंवा रिसीव करताना दिसणारा डिस्प्ले पूर्णपणे बदलला आहे. काहींना वाटतंय की कुणीतरी त्यांचं ऍप बदललं आहे, तर काहींना फोन हॅक झाल्याची भीती वाटतेय.
advertisement
1/7

अलीकडे अनेक अँड्रॉईड वापरकर्त्यांना हा अनुभव आला की त्यांच्या फोनची कॉलिंग स्क्रीन आधीसारखी नाही राहिली. कॉल करताना किंवा रिसीव करताना दिसणारा डिस्प्ले पूर्णपणे बदलला आहे. काहींना वाटतंय की कुणीतरी त्यांचं ऍप बदललं आहे, तर काहींना फोन हॅक झाल्याची भीती वाटतेय.
advertisement
2/7
खरंच हॅक झालंय का?नाही! ही हॅकिंगची गोष्ट नाही, तर Google चा अधिकृत अपडेट आहे. मे 2025 मध्ये Google ने "Material 3D Expressive" नावाचं नवीन डिझाइन आणणार असल्याचं सांगितलं होतं.
advertisement
3/7
नवीन इंटरफेसमध्ये काय बदलले?फोन अॅपमध्ये आता फक्त "Home" आणि "Keypad" हे दोन ऑप्शन्स आहेत. आधीचे "Recents" आणि "Favourites" टॅब आता Home मध्येच समाविष्ट झाले आहेत. एकाच नंबरवरून आलेले कॉल्स आता ग्रुपमध्ये न दाखवता स्वतंत्रपणे टाइमलाइनमध्ये दिसतात.
advertisement
4/7
इनकमिंग कॉल स्क्रीन बदलली कशी?नवीन डिझाइनमुळे फोन खिशातून काढताना चुकून कॉल रिसीव किंवा कट होणार नाही, यासाठी स्क्रीनचा लेआउट बदलला आहे.
advertisement
5/7
परवानगी न घेता का केलं?अनेक जण विचारत आहेत की Google ने विचारलं का नाही?कारण सोपं आहे – जर तुमच्या फोनमध्ये Google Play Store वर Auto-Update सुरू असेल, तर Phone App आपोआप अपडेट होतं. त्यामुळे कॉल स्क्रीन बदलली गेली.
advertisement
6/7
त्यानंतर Play Store मध्ये Auto-Update बंद करा.यामुळे अॅप जुन्या स्वरूपात परत येईल आणि पुढे परवानगीशिवाय अपडेट होणार नाही.
advertisement
7/7
तुमचा फोन हॅक झालेला नाही. हा फक्त Google चा नवीन डिझाइन अपडेट आहे. जर आवडलं नाही तर जुनं इंटरफेस परत मिळवणं पूर्णपणे तुमच्या हातात आहे.