TRENDING:

Mobile Data Save Tips : कमी वापरातच संपतो मोबाईल डेटा? मग ही ट्रीक तुमच्या कामाची, रिचार्जचा ही वाचवेल खर्च

Last Updated:
how to save mobile data : टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या किमतीचे डेटा प्लान्स देतात, पण तरीही दिवसाअखेरीस ‘डेटा संपल्याची’ नोटिफिकेशन दिसतेच. अशावेळी अनेक जणांना अ‍ॅड-ऑन डेटा रिचार्ज करावा लागतो आणि त्यामुळे महिन्याचा मोबाईल खर्च वाढतो.
advertisement
1/8
कमी वापरातच संपतो मोबाईल डेटा? मग ही ट्रीक तुमच्या कामाची, रिचार्जचा वाचवेल खर्च
आजकाल स्मार्टफोन वापरणाऱ्यांपैकी अनेकांना एकच त्रास सतावत असतो – मोबाईल डेटा फार लवकर संपतो. कधीकधी तर युजर्सना हे जाणवतं की त्यांनी फक्त पाच ते सहा व्हिडीओ पाहिले आणि त्यांच्या फोनचा डेटा 50 टक्के संपला असल्याचा मेसेज आला.
advertisement
2/8
टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या किमतीचे डेटा प्लान्स देतात, पण तरीही दिवसाअखेरीस ‘डेटा संपल्याची’ नोटिफिकेशन दिसतेच. अशावेळी अनेक जणांना अ‍ॅड-ऑन डेटा रिचार्ज करावा लागतो आणि त्यामुळे महिन्याचा मोबाईल खर्च वाढतो.
advertisement
3/8
जर तुम्हालाही नेहमी डेटा कमी पडतो, बारंवार रिचार्ज करावा लागतोय, तर खाली दिलेले काही साधे पण उपयोगी उपाय नक्की करून पाहा. यामुळे डेटा वाचवता येईल आणि खर्चही कमी होईल.
advertisement
4/8
1. डेटा सेव्हर मोड ऑन कराआजच्या बहुतेक स्मार्टफोनमध्ये ‘डेटा सेव्हर’ मोड असतो. हा मोड ऑन केल्यावर बॅकग्राऊंडमधील अ‍ॅप्स कमी डेटा वापरतात. त्यामुळे अनावश्यक डेटा वापर टाळता येतो. हा मोड तुम्ही ‘Settings > Network & Internet > Data Saver’ या मार्गाने सहज ऑन करू शकता.
advertisement
5/8
2. अ‍ॅप्सचे ऑटो अपडेट बंद कराकधी कधी प्ले स्टोअरमधून अ‍ॅप्स आपोआप अपडेट होतात. हे अपडेट्स मोठ्या प्रमाणात डेटा वापरतात. त्यामुळे ‘Auto-update apps’ हा पर्याय ‘Wi-Fi only’ वर सेट करा किंवा पूर्णपणे बंद करा. अ‍ॅप्स तुम्ही हवे तेव्हा मॅन्युअली अपडेट करू शकता.
advertisement
6/8
3. व्हिडीओ स्ट्रीमिंग क्वालिटी कमी कराYouTube, Netflix, Hotstar यांसारख्या अ‍ॅप्सवर व्हिडीओ पाहताना सर्वाधिक डेटा वापर होतो. जर व्हिडीओ फुल HD मध्ये पाहत असाल, तर डेटा लवकर संपतो. त्यामुळे ‘Video Quality’ सेटिंगमध्ये जाऊन 144p, 240p किंवा 360p अशा कमी क्वालिटीवर सेट करा. थोडी क्वालिटी कमी होईल पण डेटा मात्र वाचेल.
advertisement
7/8
4. अनावश्यक अ‍ॅप्स डिलीट कराअनेकदा आपल्याकडे असे अ‍ॅप्स फोनमध्ये असतात जे आपण कधीच वापरत नाही. पण तरीही ते बॅकग्राऊंडमध्ये डेटा वापरत असतात. त्यामुळे असे अ‍ॅप्स ओळखा आणि अनइंस्टॉल करा. यामुळे तुमचा डेटा आणि फोन दोन्ही हलके होतील.
advertisement
8/8
थोडंसं स्मार्ट वापर केल्यास डेटा जपता येतो आणि महिन्याचा खर्चही नियंत्रित करता येतो. वरील टिप्स नियमित वापरात आणा आणि ‘डेटा संपला’ ही तक्रार कायमची दूर करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Mobile Data Save Tips : कमी वापरातच संपतो मोबाईल डेटा? मग ही ट्रीक तुमच्या कामाची, रिचार्जचा ही वाचवेल खर्च
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल