Instagram ची चॅट लपवण्याचा जुगाड! तुम्हाला माहिती नसेल हे जबरदस्त सीक्रेट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Instagram Secret Tricks: तुम्हाला माहिती आहे का की, एका ट्रिकने तुम्ही इंस्टाग्रामवर तुमचे चॅट लपवू शकता. जाणून घ्या काय आहे ही ट्रिक.
advertisement
1/7

इंस्टाग्रामच्या सीक्रेट ट्रिक्स : Meta's Instagram हे फोटो, व्हिडिओ आणि रील्ससाठी सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे. प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रमाणे, Instagram मध्ये देखील अशा अनेक सीक्रेट ट्रिक्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे काम सोपे करू शकता.
advertisement
2/7
चॅट हाइड करणे : फोटो शेअरींग व्यतिरिक्त इंस्टाग्रामवर डायरेक्ट मेसेज (DM) सुविधाही देण्यात आली आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की एका ट्रिकने तुम्ही तुमच्या चॅट्स लपवू शकता.
advertisement
3/7
मेसेज बॉक्सवर जा : इंस्टाग्राममध्ये तुमची चॅट लपवण्यासाठी प्रथम तुमच्या इन्स्टा मेसेज बॉक्सवर जा.
advertisement
4/7
प्रोफाइलवर टॅप करा : तुम्हाला जी चॅट लपवायची आहे ती चॅड निवडा. यानंतर, ज्या व्यक्तीला तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे त्याच्या प्रोफाइलवर टॅप करा.
advertisement
5/7
तीन डॉट्सवर क्लिक करा : प्रोफाइलवर टॅप केल्यानंतर तुमच्यासमोर Options चा ऑप्शन दिसेल. त्यापुढील तीन डॉट्सवर क्लिक करा.
advertisement
6/7
Restrict ऑप्शन दिसेल : तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Restrict हा ऑप्शन दिसेल. त्यानंतर तो मेसेज चॅट लिस्टमधून काढून टाकला जाईल. यानंतर तुम्हाला हे चॅट रिक्वेस्ट ऑप्शनमध्ये दिसेल.
advertisement
7/7
या चॅट कुठे दिसतील?: तुम्ही ते चॅट रिक्वेस्ट फोल्डरवर पाहू शकता. त्याच वेळी, तुम्ही Unrestrict ऑप्शन निवडून चॅट लिस्टमध्ये मेसेज परत करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Instagram ची चॅट लपवण्याचा जुगाड! तुम्हाला माहिती नसेल हे जबरदस्त सीक्रेट