UP चा 'कचोरीवाला' बनला करोडपती.. 500 रुपये घेऊन गेला आणि 5 कोटी घेऊन आला; प्रकरण ऐकताच डोक गरगरेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आकाश नावाचा हा तरुण आपल्या वडिलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी सांभाळत होता. त्यासाठी त्याने ‘मा चामुंडा स्वीट अँड नमकीन’ नावाने छोटंसं रेस्टॉरंट सुरू केलं.
advertisement
1/8

उत्तर प्रदेशातल्या हातरस शहरातला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. फक्त 23 वर्षांचा तरुण अचानक करोडपती कसा काय झाला, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
advertisement
2/8
आकाश नावाचा हा तरुण आपल्या वडिलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी सांभाळत होता. त्यासाठी त्याने ‘मा चामुंडा स्वीट अँड नमकीन’ नावाने छोटंसं रेस्टॉरंट सुरू केलं.
advertisement
3/8
दररोज कचोरी-वडे विकणाऱ्या या तरुणाने अचानक महागडी गाडी बुक केली, सोन्याचे दागिने विकत घेतले आणि लाखो रुपयांची बाईक चालवू लागला.
advertisement
4/8
फक्त ₹500 ने बँक खाते सुरू केलेल्या या मुलाकडे पाहता पाहता तब्बल ₹5 कोटींची प्रॉपर्टी जमा झाली. तेव्हा शेजाऱ्यांना संशय येऊ लागला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं.
advertisement
5/8
पोलिसांनी विशेष टीम गठीत करून तपास सुरू केला. तपास जसजसा पुढे गेला, तसतसं धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या.
advertisement
6/8
आकाश फक्त कचोरी विकून करोडपती झाला नव्हता! त्यामागे होती एक बँकिंग ट्रिक. त्याने ओव्हरड्राफ्टची सुविधा वापरून अवैध पद्धतीने 5 कोटी रुपये काढले होते.
advertisement
7/8
पोलिस तपासात समोर आलं की, आकाशने ही रक्कम शेअर बाजारात गुंतवली. तब्बल ₹3.5 कोटी शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केल्याचं उघड झालं.
advertisement
8/8
आता पोलिसांच्या चौकशीत आकाशसोबतच तीन बँक कर्मचाऱ्यांचा ही तपास होत आहे. हातरसचा साधा कचोरीवाला कसा करोडोंचा घोटाळेबाज ठरला, हे ऐकून लोक अजूनही थक्क आहेत. तपास अद्याप सुरू असून संपूर्ण गुपित लवकरच समोर येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
UP चा 'कचोरीवाला' बनला करोडपती.. 500 रुपये घेऊन गेला आणि 5 कोटी घेऊन आला; प्रकरण ऐकताच डोक गरगरेल