Jio कडे आहेत 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 5 स्वस्त प्लॅन्स! पहा बेनिफिट्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Jio Recharge Plans: डेटा, कॉलिंग, एसएमएससह 28 दिवसांची व्हॅलिडिटी हवी आहे का? तर आज आम्ही तुम्हाला अशा 5 स्वस्त जिओ प्लॅन्सबद्दल सांगत आहोत. ज्यात तुम्हाला या सर्व सुविधा मिळतील, सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत 189 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
1/6

Reliance Jio Plans: जिओकडे प्रीपेड नंबर चालवणाऱ्या यूझर्ससाठी अनेक उत्तम प्लॅन्स आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा पाच स्वस्त रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत जे 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतात. डेटा, कॉलिंग, एसएमएस आणि इतर फायद्यांसह 28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला सर्वात स्वस्त प्लॅन 189 रुपयांपासून सुरू होतो.
advertisement
2/6
Jio 189 Plan : जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर 2 जीबी हाय स्पीड डेटा आणि लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा मिळते. 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह या प्ल्रनमध्ये 300 एसएमएस, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचा फ्री अॅक्सेस देखील मिळतो.
advertisement
3/6
Jio 249 Plan : 249 रुपयांच्या या जिओ प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी हाय स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस दिले जातात. 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचा फ्री अॅक्सेस देखील मिळतो.
advertisement
4/6
Jio 299 Plan : तुम्हाला 1.5 जीबी डेली डेटा असलेला प्लॅन हवा असेल, तर तुम्हाला 299 रुपयांमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह हा उत्तम प्लॅन मिळेल. अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देत असलेल्या या प्लॅनमध्ये जिओ क्लाउड आणि जिओ टीव्हीचा फ्री अॅक्सेस मिळतो.
advertisement
5/6
Jio 329 Plan : रिलायन्स जिओचा हा 329 रुपयांचा प्लॅन खास आहे. कारण या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएस व्यतिरिक्त, कंपनी प्रीपेड यूझर्सना JioSaavn Pro देखील देत आहे. दररोज 1.5 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस ऑफर करत असलेल्या या प्लॅनमध्ये जिओ क्लाउड आणि जिओ टीव्हीसह जिओ सावन प्रोचाही समावेश आहे.
advertisement
6/6
Jio 349 Plan : 1 जीबी आणि 1.5 जीबी डेली डेटा असलेला प्लॅन तुमच्यासाठी पुरेसा नसेल, तर तुम्ही 2 जीबी डेली डेटासह हा प्लॅन खरेदी करू शकता. 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह या प्लॅनमध्ये डेली 2 जीबी डेटा, फ्री अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचा अॅक्सेस मिळतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Jio कडे आहेत 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 5 स्वस्त प्लॅन्स! पहा बेनिफिट्स