अमिषा पटेलच्या आयुष्यात 'गदर'! चेक बाउंसिंग प्रकरणात सौडलं मौन; म्हणाली, 'सेटलमेंट...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
राजपाल यादवच्या सुटकेनंतर अमिषा पटेलवर चेक बाउन्सिंगचा आरोप करण्यात आला. गेली अनेक दिवस हे प्रकरण चर्चेत आहे. अमिषाने या सगळ्यावर अखेर मौन सोडलं.
advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव चेक बाऊसिंग प्रकरणात जवळपास 11 दिवस जेलमध्ये होता. नुकतीच त्याची सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर अभिनेत्री अमिषा पटेलचे नाव आता चर्चेत आहे.
advertisement
2/7
2017 मधील एका प्रकरणात अमिशा पटेलचं नाव समोर आलं आहे. राजपाल यादवनंतर अमिषा पटेलला देखील जेल होऊ शकते असं म्हटलं जात आहे. दरम्यान या सगळ्या चर्चांवार स्वत: अमिषा पटेलनं मौन सोडलं आहे.
advertisement
3/7
मीडिया रिपोर्ट्स, सोमवारी मुरादाबाद न्यायालयाने 2017 च्या चेक बाउन्स प्रकरणात अमिषा पटेलविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मुरादाबादमधील एका कंपनीचे मालक पवन कुमार वर्मा यांनी ही तक्रार दाखल केली होती. या वृत्तांनंतर अमिषाने यावर प्रतिक्रिया देत मौन सोडलं आहे. तिनं या सगळ्यात तिची बाजू मांडली.
advertisement
4/7
अमिषाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "माध्यमांमध्ये Moradabad येथे Pawan Verma यांनी सुरू केलेल्या काही कारवाईंबाबत बातम्या येत आहेत. याबाबत मी सर्वांना कळवू इच्छिते की हा खूप जुना विषय आहे. अनेक वर्षांपूर्वीच या प्रकरणात संबंधित पवन वर्मा यांनी सेटलमेन्ट करारावर सही करून ठरलेली संपूर्ण रक्कम स्वीकारली होती."
advertisement
5/7
अमिषा पुढे म्हणाली, "असं असूनही त्यांनी खोटे आरोप करत पुन्हा कारवाई दाखल केल्याचं दिसत आहे. या व्यक्तीचे खोटेपण उघड करण्यासाठी माझे वकील फसवणुकीसंदर्भात योग्य फौजदारी कारवाई सुरू करत आहेत. दरम्यान मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करणं पसंत करते आणि खोट्या कारणांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सार्वजनिक तमाशा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करते."
advertisement
6/7
हा वाद 2017 मध्ये झालेल्या एका लग्नाच्या कार्यक्रमाशी संबंधित आहे. मुरादाबाद येथील कार्यक्रम आयोजक पवन वर्मा यांनी तक्रार दाखल केली होती की त्यांनी 16 नोव्हेंबर 2017 रोजी एका लग्नात अमिषा पटेलला सादरीकरण करण्यासाठी बुक केले होते. 14.50 लाख अँडवान्स देण्यात आले होते. मुरादाबादमधील दिल्ली रोडवरील एका हॉटेलमध्ये तिच्या राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. परंतु अभिनेत्री कार्यक्रमाला उपस्थित राहिली नाही.
advertisement
7/7
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, चर्चेनंतर अमिषा यांनी संपूर्ण रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. असा आरोप आहे की 10 लाख रुपये रोख परत करण्यात आले होते परंतु उर्वरित 4.5 लाख रुपयांचा चेक बाउन्स झाला. त्यानंतर आयोजकांनी न्यायालयात धाव घेतली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अमिषा पटेलच्या आयुष्यात 'गदर'! चेक बाउंसिंग प्रकरणात सौडलं मौन; म्हणाली, 'सेटलमेंट...'