Kazakhstan Plane Crash: धुक्यामुळे रुट बदलला अन् घात झाला, घटनास्थळावरचे PHOTO आले समोर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Kazakhstan plane crash updates: अपघातादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये विमान अक्षरश: हेलकावे खात कोसळत असल्याचं दिसत आहे.
advertisement
1/7

ऐन ख्रिसमसदरम्यान शोककळा पसरली आहे. याचं कारण म्हणजे 110 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या विमानाचा रुट बदलला होता, त्याच दरम्यान हा अपघात झाला आहे.
advertisement
2/7
कझाकस्तानमधील अकताऊ शहराजवळ 105 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर्सला घेऊन जाणारं विमान कोसळलं. मध्य आशियाई देशाच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले की प्राथमिक अहवालानुसार विमानातील काही लोकांना रेस्क्यू करण्यात यश आलं आहे.
advertisement
3/7
अपघातादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये विमान अक्षरश: हेलकावे खात कोसळत असल्याचं दिसत आहे.
advertisement
4/7
या अपघाताची माहिती मिळताच तातडीनं आपत्कालीन व्यवस्थापन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू केलं. आगीवर नियंत्रण मिळवलं आणि कूलिंग ऑपरेशन सुरू केलं.
advertisement
5/7
मिळालेल्या माहितीनुसार हे विमान अझरबैजान एअरलाइन्सद्वारे चालवले जात होते. हे विमान बाकूहून रशियातील चेचन्या येथील ग्रोझनी येथे जात होते. पण, ग्रोझनीमध्ये धुक्यामुळे त्याचा मार्ग बदलण्यात आला.
advertisement
6/7
कझाकिस्तानच्या स्थानिक मीडियानुसार, विमानात 105 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर्स होते. तथापि, रॉयटर्सने या माहितीची पुष्टी केलेली नाही. अझरबैजान एअरलाइन्सकडून या अपघाताबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
advertisement
7/7
ही दुर्घटना विमान वाहतूक सुरक्षेसाठी आणखी एक आव्हानात्मक घटना आहे. अधिक माहिती आल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
Kazakhstan Plane Crash: धुक्यामुळे रुट बदलला अन् घात झाला, घटनास्थळावरचे PHOTO आले समोर