TRENDING:

Will Smith: बॉलिवूड फिल्ममध्ये काम करण्यासाठी उतावीळ झालाय हॉलिवूड सुपरस्टार, थेट शाहरुख खानकडेच मागितलं काम

Last Updated:
'मेन इन ब्लॅक' आणि 'बॅड बॉईज' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा नायक विल स्मिथ आता बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी अक्षरशः उतावीळ झाला आहे.
advertisement
1/7
बॉलिवूड फिल्ममध्ये काम करण्यासाठी उतावीळ झालाय हॉलिवूड सुपरस्टार
मुंबई: पडद्यावर एका बाजूला बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि दुसऱ्या बाजूला हॉलिवूडचा सुपरस्टार विल स्मिथ... नुसत्या विचारानेच अंगावर काटा येतो ना? पण आता हे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
advertisement
2/7
'मेन इन ब्लॅक' आणि 'बॅड बॉईज' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा नायक विल स्मिथ आता बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी अक्षरशः उतावीळ झाला आहे. त्याने केवळ इच्छाच व्यक्त केली नाही, तर चक्क शाहरुख खानकडे कामासाठी वर्णी लावली आहे.
advertisement
3/7
विल स्मिथचं भारतप्रेम काही नवीन नाही, पण यावेळी त्याने थेट बड्या सेलिब्रिटींशी संपर्क साधला आहे. विलने नुकतंच महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधला. या भेटीत विलने बच्चन सरांना 'Big W' (Big Wills) असं टोपणनाव दिलं. दोघांमध्ये एकत्र काम करण्याबाबत अतिशय सकारात्मक चर्चा झाली.
advertisement
4/7
इतकंच नाही, तर त्याने सलमान खान सोबतही काही प्रोजेक्ट्सवर चर्चा केली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ती गाडी पुढे सरकू शकली नाही. अखेर विलने आपला मोर्चा शाहरुख खानकडे वळवला असून, "मला तुमच्या फिल्ममध्ये घ्या," अशी विनंती त्याने एका कार्यक्रमात मजेत पण मनापासून केली.
advertisement
5/7
विल स्मिथ याआधीच बॉलिवूडमध्ये दिसला आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर २' मधील 'जवानी' गाण्यावर त्याने टायगर श्रॉफसोबत जबरदस्त डान्स केला होता. आपल्या 'बकेट लिस्ट' या डॉक्युमेंट्रीसाठी तो भारतात आला असताना त्याने इथल्या संस्कृतीचा आणि बॉलिवूडच्या ग्लॅमरचा मनसोक्त आनंद घेतला होता. तेव्हापासूनच कधी एकदा बॉलिवूड मुव्ही करतोय, असं त्याला झालं आहे.
advertisement
6/7
सध्या शाहरुख खान त्याच्या आगामी 'किंग' या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित या सिनेमात शाहरुखसोबत त्याची लेक सुहाना खान आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
आता सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे, जर 'किंग' मध्ये विल स्मिथचा एखादा पॉवरफुल कॅमिओ किंवा महत्त्वाची भूमिका असेल, तर? विचार करा, 'पठाण' आणि 'जवान'नंतर शाहरुखचा हा चित्रपट जागतिक स्तरावर बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Will Smith: बॉलिवूड फिल्ममध्ये काम करण्यासाठी उतावीळ झालाय हॉलिवूड सुपरस्टार, थेट शाहरुख खानकडेच मागितलं काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल