TRENDING:

मुंबईचे पॉवर मॅप बदलणारे हाय-व्होल्टेज वॉर्ड्स, इथे चुरस टोकाला; BMC निवडणुकीतील 10 वॉर्ड्सची Inside Story

Last Updated:
BMC Elections Inside story: मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून, शहरातील काही वॉर्ड्समध्ये लढत अतिशय चुरशीची झाली आहे. पक्षफुटी, थेट आमनेसामने असलेले जुने सहकारी आणि स्थानिक समीकरणांमुळे हे 10 वॉर्ड्स बीएमसी सत्तेचा कौल ठरवणारे मानले जात आहेत.
advertisement
1/11
मुंबईची पॉवर मॅप बदलणारे वॉर्ड्स, इथे चुरस टोकाला; BMC निवडणुकीतील Inside Story
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकांचा प्रचार जसजसा रंगत चालला आहे, तसतसे शहरातील अनेक वॉर्ड राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीचे ठरताना दिसत आहेत. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी मुंबईतील 227 वॉर्डमध्ये उमेदवार रिंगणात उतरले असून, काही वॉर्डमध्ये थेट लढती, तर काही ठिकाणी तिरंगी आणि चौकोनी संघर्ष पाहायला मिळत आहे. पक्षफुटी, जुने सहकारी विरुद्ध नवे प्रतिस्पर्धी, स्थानिक समीकरणे आणि मतांचे ध्रुवीकरण यामुळे काही वॉर्ड विशेष लक्ष वेधून घेत आहेत. अशाच मुंबईतील 10 महत्त्वाच्या वॉर्डवर एक नजर.
advertisement
2/11
वॉर्ड क्रमांक 194 – प्रभादेवी: प्रभादेवीतील हा प्रतिष्ठेचा वॉर्ड राजकीय वारसांमुळे चर्चेत आहे. शिवसेना (उद्धव गट) चे निशिकांत शिंदे आणि शिंदे गटाचे समाधान सरवणकर यांच्यात थेट सामना आहे. निशिकांत हे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू असून, समाधान हे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत. सेनेचा कोअर भाग मानल्या जाणाऱ्या या परिसरात कडवी लढत अपेक्षित आहे.
advertisement
3/11
वॉर्ड क्रमांक 206 – शिवडी: शिवडीतील हा वॉर्डही सेनेचा बालेकिल्ला मानला जातो. येथे शिवसेना (उद्धव गट) चे सचिन पडवळ आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक नाना आंबोळे यांच्यात सामना आहे. 2017 मध्ये पडवळ यांनी विजय मिळवला होता. यंदा मराठी मतदारांच्या सहानुभूतीवर दोन्ही बाजूंनी भर दिला जात आहे.
advertisement
4/11
वॉर्ड क्रमांक 173 – सायन: सायनमधील या वॉर्डमध्ये महायुतीतील दोन घटक एक म्हणजे शिंदे गटाची शिवसेना आणि दुसरे म्हणजे भाजप होय. निवडणुकीत आता हे दोन्ही आमनेसामने आहेत. शिवसेनेच्या पूजा कांबळे, भाजपच्या शिल्पा केळुसकर आणि शिवसेना (उद्धव गट) च्या प्रणिता वाघढरे यांच्यात तिरंगी लढत आहे. ठाकरे गटाचा हा बालेकिल्ला मानला जात असल्याने लढत अधिक चुरशीची ठरते आहे.
advertisement
5/11
वॉर्ड क्रमांक 84 – विलेपार्ले: विलेपार्लेतील या वॉर्डमध्ये यंदा ‘पत्नी विरुद्ध पत्नी’ असा सामना पाहायला मिळत आहे. मनसेच्या रुपाली दळवी आणि भाजपच्या अंजली सामंत या दोघीही 2017 मध्ये आमनेसामने असलेल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या पत्नी आहेत. मागील निवडणुकीत भाजपने हा वॉर्ड जिंकला होता. यावेळी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव गट) ने उमेदवार न दिल्यामुळे लढत थेट मनसे आणि भाजपमध्ये होत आहे.
advertisement
6/11
वॉर्ड क्रमांक 167 – कुर्ला: हा मुंबईतील एकमेव असा वॉर्ड आहे जिथे सत्ताधारी महायुतीतील कोणत्याही मोठ्या पक्षाने उमेदवार दिलेला नाही. काँग्रेसच्या समन आझमी, शिवसेना (उद्धव गट) च्या सुवर्णा मोरे आणि समाजवादी पक्षाच्या तबस्सुम राशिद यांच्यात येथे लढत आहे. त्यामुळे हा वॉर्ड जवळपास विरोधकांकडे निश्चित मानला जात आहे.
advertisement
7/11
वॉर्ड क्रमांक 5 – दहिसर: उत्तर मुंबईतील दहिसर भागातील हा वॉर्ड पूर्वी अविभाजित शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. यावेळी येथे शिवसेना (शिंदे गट) चे संजय घाडी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) च्या सुजाता पाटेकर आणि काँग्रेसचे डॉ. नरेंद्र कुमार यांच्यात तिरंगी लढत आहे. घाडी आणि पाटेकर हे दोघेही पूर्वी एकाच पक्षातले सहकारी असून त्यांची तळागाळातील पकड मजबूत आहे. अशात काँग्रेसचा उमेदवार कितपत मते विभागतो, यावर निकाल अवलंबून राहण्याची शक्यता आहे.
advertisement
8/11
वॉर्ड क्रमांक 165 – कुर्ला: कुर्ल्यातील या वॉर्डमध्ये दोन वजनदार मुस्लिम नेत्यांमध्ये थेट लढत आहे. काँग्रेसचे अश्रफ आझमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कप्तान मलिक यांच्यात सामना रंगतो आहे. 2017 मध्ये आझमी यांनी भाजपचा पराभव केला होता. मात्र मलिक यांनी आपला पूर्वीचा वॉर्ड बदलल्याने यंदाची लढत अधिक चुरशीची झाली आहे. भाजपचे रुपेश पवार तिसरे महत्त्वाचे उमेदवार असून मतविभागणीचा फायदा घेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
advertisement
9/11
वॉर्ड क्रमांक 23 – कांदिवली: कांदिवली पश्चिमेतील हा वॉर्ड भाषिक आणि सामाजिक समीकरणांमुळे चर्चेत आहे. एकूण 11 उमेदवारांपैकी केवळ एकच मराठी उमेदवार असून तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा किरण जाधव आहे. भाजपचे शिवकुमार झा, काँग्रेसचे आर. पी. पांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरारी झा हे सर्व उत्तर भारतीय उमेदवार आहेत. मतदारसंघाच्या रचनेनुसारच पक्षांनी उमेदवार निवडल्याचे स्पष्ट दिसते आणि भाजप व काँग्रेसमध्ये येथे थेट चुरस पाहायला मिळत आहे.
advertisement
10/11
वॉर्ड क्रमांक 45 – मालाड: मालाड पूर्वेतील या वॉर्डमध्ये शिवसेना (उद्धव गट) कडून निरव बरोत मैदानात असून, ते माजी भाजप उपमहापौर दिवंगत राम बरोत यांचे पुत्र आहेत. 2017 मध्ये राम बरोत यांनी 10 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. यंदा भाजपने संजय कांबळे या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे, तर काँग्रेसकडून रमेश यादव रिंगणात आहेत. त्यामुळे हा वॉर्डही लक्षवेधी ठरतो आहे.
advertisement
11/11
वॉर्ड क्रमांक 225 – कुलाबा: कुलाब्यातील हा वॉर्ड आधीच चर्चेत असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्यामुळे तो गाजला आहे. शिवसेना (उद्धव गट) कडून अजिंक्य धात्रक, भाजपकडून हर्षिता नार्वेकर आणि शिंदे गटाकडून सुजाता सनप यांच्यात येथे तिरंगी लढत आहे. 2017 मध्ये सुजाता सनप यांनी विजय मिळवला होता. महायुतीतच फूट पडल्यामुळे हा वॉर्ड विशेष लक्षवेधी ठरला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मुंबईचे पॉवर मॅप बदलणारे हाय-व्होल्टेज वॉर्ड्स, इथे चुरस टोकाला; BMC निवडणुकीतील 10 वॉर्ड्सची Inside Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल