TRENDING:

दररोज गाजर खायचा बॉयफ्रेंड, वैतागली गर्लफ्रेंड; नंतर समजलं असं विचित्र कारण विश्वासच बसेना

Last Updated:
Boyfriend Eat Carrot : बॉयफ्रेंड दररोज एक गाजर खायचा, गर्लफ्रेंडला त्याची ही सवय विचित्र वाटली. जेव्हा त्याने त्याची फूड डायरी पाहिली तेव्हा ती शॉक झाली.
advertisement
1/7
दररोज गाजर खायचा BF, वैतागली GF; नंतर समजलं असं विचित्र कारण विश्वासच बसेना
फळं आणि भाज्या खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. प्रत्येक फळ आणि भाज्या आपल्या शरीराला वेगवेगळे पोषक तत्वे प्रदान करतात. पण दररोज एकच फळ किंवा एकच भाजी कोण खाईल? असं करत होता एक तरुण...
advertisement
2/7
एक तरुण दररोज एक गाजर खायचा. त्याच्या गर्लफ्रेंडला ही सवय विचित्र वाटली, ती वैतागली होती. पण जेव्हा तिला यामागील कारण समजलं तेव्हा तिला त्याची दया आली.
advertisement
3/7
तरुणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, "जेव्हा माझ्या बॉयफ्रेंडने मला सांगितलं की तो दररोज गाजर का खातो, तेव्हा मी खूप रडले"
advertisement
4/7
तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडची फूड डायरीही वाचली. तेव्हा तिला रडू आलं. फूड डायरी ही एक प्रकारची जर्नल आहे ज्यामध्ये लोक त्यांच्या कॅलरीजची संख्या राखण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी त्यानुसार खाण्यास मदत करण्यासाठी फूड चार्ट तयार करतात.
advertisement
5/7
मिरर वेबसाइटवरील वृत्तानुसार ही संपूर्ण घटना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर शेअर करण्यात आली होती, जिथं मुलीने एक छोटा व्हिडिओ पोस्ट केला होता. तरुणीने सांगितल्यानुसार तिचा बॉयफ्रेंड दररोज गाजर खायचा कारण तिसऱ्या वर्गातील मुलं त्याला तो खूप गोरा असल्याने चिडवत होते. गाजर खाल्ल्याने तो सावळा होईल असं त्याला वाटला. (AI Generated)
advertisement
6/7
हेल्थलाइन या आरोग्य वेबसाइटनुसार, गाजरसारखे बीटा-कॅरोटीनयुक्त पदार्थ त्वचेवर जळजळ निर्माण न करता हलका टॅन तयार करण्यास मदत करू शकतात. काही संशोधनात असंही सूचित केलं आहे की बीटा-कॅरोटीन सूर्यप्रकाशास संवेदनशील असलेल्या लोकांच्या त्वचेचं संरक्षण करू शकतात. जरी अधिक संशोधन आवश्यक असलं तरी, जास्त गाजर खाल्ल्याने कॅरोटीनोसिस होऊ शकतो. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये त्वचा पिवळी-केशरी रंगाची होते. पण ही स्थिती मानवांसाठी हानिकारक नाही. गाजर खाण्याचे प्रमाण कमी केल्याने ही स्थिती उलट होऊ शकते.
advertisement
7/7
रेडिटच्या माइल्डली इंटरेस्टिंग फोरमवरही यासंबंधीच्या एका प्रकरणाची चर्चा झाली. एका महिलेने तिच्या त्वचेतील बदलांचे आधी आणि नंतरचे फोटो शेअर केले, ज्यामध्ये तिने गाजर खाण्याआधी आपला चेहरा लाल आणि नंतर सामान्य दिसत असल्याचं दाखवलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
दररोज गाजर खायचा बॉयफ्रेंड, वैतागली गर्लफ्रेंड; नंतर समजलं असं विचित्र कारण विश्वासच बसेना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल