गोधडी झाडली आणि धुळीसारखा पडला पैसा; बुलडाण्यातील भिकाऱ्याची संपत्ती पाहून पोलीसही अवाक
- Published by:Priya Lad
Last Updated:
भिकाऱ्याच्या अपघातानंतर पोलिसांनी त्याच्या वस्तू तपासल्या आणि त्यांनाही धक्का बसला.
advertisement
1/5

बुलडाणा/राहुल खंडारे - जगातील सर्वात श्रीमंत भिकारी हा मुंबईत आढळला होतो. पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही एका भिकाऱ्याकडे लाखो रुपयांची संपत्ती आहे. जी पाहून पोलीसही थक्क झाले आहेत.
advertisement
2/5
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील भिकारी दीपक मोरे. सायकलवरून जात असताना त्याला दुचाकीनं चिरडलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीबाबत पोलिसांनी माहिती मिळवायला सुरूवात केली.
advertisement
3/5
पोलीस निरीक्षक राजेश शिंगडे म्हणाले, गोधडीत लाखो रुपयांची रक्क सापडली. तब्बल 1 लाख 63 हजार रुपये पैसे या गोधडीत होते. शिवाय अनेक बँकांचं पासबुक आणि त्या बँकांमध्येही लाखो रुपये असल्याचं पोलीस तपासात समजलं.
advertisement
4/5
अपघातस्थळी पोलिसांना भिकाऱ्याची सायकल, थैली आणि गोधडी सापडली. त्यासोबतच भिकाऱ्याचं घबडाही.
advertisement
5/5
एकीकडे अठरा विश्वे दारिद्र्य, उपासमार आणि राहायला छत नसणं ही भिकाऱ्याची व्याख्या केली जात होती. मात्र आता या भिकाऱ्यांकडे लाखोंची रोकड, बँक बॅलन्स आणि अचल संपत्ती आढळून आल्याने ग्रामीण भागातील भिकाऱ्यांचीही श्रीमंती समोर आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
गोधडी झाडली आणि धुळीसारखा पडला पैसा; बुलडाण्यातील भिकाऱ्याची संपत्ती पाहून पोलीसही अवाक