TRENDING:

Butterfly, Butterfly...Trend, शिक्षकानं लढवली शक्कल, विद्यार्थी संख्या अचानक वाढली!

Last Updated:
Butterfly, Butterfly where are you going, where are you going...? या गाण्यानं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. शालेय विद्यार्थी अगदी घसा फाडून फाडून आनंदाने हे गाणं गाताना दिसायचे. मुलांना हे गाणं प्रचंड आवडलंय, हे लक्षात घेऊन आता एका शिक्षकांनी वेगळीच शक्कल लढवली. विशेष म्हणजे यानंतर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अचानक वाढली, जे कौतुकास्पद आहे. (अर्पित बडकुल, प्रतिनिधी / दमोह)
advertisement
1/5
Butterfly, Butterfly...Trend, शिक्षकानं लढवली शक्कल, विद्यार्थी संख्या वाढली!
आता शिक्षक आणि विद्यार्थी दोघंही सोशल मीडियाचा वापर करतात. त्यातून शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांच्या खोड्या आणि शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी समोर येते. 
advertisement
2/5
आता पालक आपल्या मुलांच्या शिक्षणावर भरपूर खर्च करून त्यांना खासगी शाळांमध्ये शिकवतात. तर दुसरीकडे सरकारी शाळांची विद्यार्थी संख्या मात्र घटताना दिसते. याच शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून एक अनोखी कल्पना शोधून काढली. 
advertisement
3/5
सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना फुलपाखरू म्हणजेच बटरफ्लाय खूप आवडतात हे लक्षात घेऊन मध्य प्रदेशातील दमोह भागात असलेल्या बटियागढच्या सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी शाळेत थेट Butterfly सेल्फी पॉईंट तयार केला. 
advertisement
4/5
यामध्ये भिंतीवर अत्यंत सुंदर असं फुलपाखरू रेखाटलं असून त्यात आकर्षक रंग भरलेले आहेत. फुलपाखरूच्या दोन पंखांमध्ये विद्यार्थी उभे राहून फोटो काढू शकतात. जेणेकरून ते पंख त्यांचेच आहेत असं वाटतं. 
advertisement
5/5
हे फुलपाखरू विद्यार्थ्यांना विशेष आवडलं असून ते एकापाठोपाठ एक तिथं उभे राहून फोटो काढतात. शिवाय अभ्यासातही त्यांचं छान मन रमतंय. शाळेतली विद्यार्थी संख्या आधीपेक्षा आता वाढली आहे, हे विशेष. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Butterfly, Butterfly...Trend, शिक्षकानं लढवली शक्कल, विद्यार्थी संख्या अचानक वाढली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल