Chanakya Niti : बायको असताना पुरुष दुसऱ्या महिलेकडे आकर्षित का होतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
अरेंज नव्हे तर कित्येक लव्ह मॅरेजमध्येही पुरुषांना लग्नानंतर दुसरी महिला आवडू लागते. मग यामागील कारणांचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत ही कारणं सांगितली आहेत.
advertisement
1/7

पुरुष आणि स्त्रिया एकमेकांकडे आकर्षित होतात आणि हे सामान्यही आहे. जेव्हा आकर्षण कौतुकाच्या पलीकडे जाते आणि चुकीच्या नात्यात बदलतं तेव्हा चूक घडते. असं झाल्यास वैवाहिक जीवनही उद्ध्वस्त होऊ शकतं.
advertisement
2/7
लग्नाच्या काही काळानंतर अनेकदा पुरुष इतर स्त्रियांना पसंत करू लागतो. तो त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागतो, त्यांच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्याचाही विचार करू लागतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, यामागचे कारण काय आहे?
advertisement
3/7
लहान वयात लग्न : तरुण वयात व्यक्ती आपल्या करिअरबाबत गंभीर असते. समजही कमी असते. या वयात करिअरची एवढी चिंता असते की बाकी कशाकडेही लक्ष जात नाही. कालांतराने, जेव्हा जीवनात स्थैर्य येते आणि करिअर सुरळीत राहते, तेव्हा माणूस आपल्या इच्छांकडे लक्ष देतो. अशा परिस्थितीत विवाहबाह्य संबंधांचा धोका वाढू लागतो.
advertisement
4/7
शारीरिक समाधानाचा अभाव : पती-पत्नीच्या नात्यात शारीरिक समाधानाचाही महत्त्वाचा वाटा असतो. त्याच्या अभावामुळे दोघांमधील आकर्षण कमी होऊ लागते. अशा परिस्थितीतही विवाहबाह्य संबंधांकडे पावले पडू लागतात.
advertisement
5/7
नात्यात विश्वास काही लोक पत्नी असताना विवाहबाह्य संबंध योग्य मानतात. अशा परिस्थितीत पती-पत्नीच्या नात्यात विश्वास खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. विश्वास असेल तर दोघेही एकमेकांशी प्रामाणिक राहतील.
advertisement
6/7
जोडीदारासोबत आकर्षण : वैवाहिक जीवनात अनेक वेळा जोडीदाराचं मन अस्वस्थ होऊ लागतं. अशा परिस्थितीत लोक इतर महिला किंवा पुरुषांना जास्त पसंत करू लागतात. येथे पती किंवा पत्नी दोघांनीही एकमेकांची काळजी घेण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे ते प्रेम कायम राहतं.
advertisement
7/7
मुलांनंतरच्या नात्यात फरक : आई-वडील होईपर्यंत वैवाहिक जीवनात प्रेमाची तीव्रता असते. असं आढळून आलं आहे की, मुलाच्या जन्मानंतर पुरुष आपल्या पत्नीपासून दूर जाऊ लागतात. यामागचं कारण सांगितलं गेलं आहे की पत्नी आपल्या मुलाऐवजी पतीला कमी महत्त्व देऊ लागते.