फक्त एक कप कॉफी देते लाखोंची नोकरी; पण कशी ते इथं एका क्लिकवर पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
तुम्हाला नोकरी मिळणार की नाही हे त्या एक कप कॉफीवर अवलंबून आहे. एका कंपनीच्या सीईओनेच याची माहिती दिली आहे.
advertisement
1/6

नोकरीला जाताना मुलाखतीची खास तयारी केली जाते. अगदी बॉसच्या केबिननमध्ये जाण्यापासून बसण्यापर्यंत, सर्वाची विशेष काळजी घ्यावी लागते. शिवाय बॉस काय विचारेल आणि काय नाही, याची धाकधूक मनात असते. तुम्ही पण तुम्हाला माहिती आहे का, एक अशी कंपनी जिथं एक कॉफी तुम्हाला लाखोंची नोकरी मिळवून देते.
advertisement
2/6
नोकरीची मुलाखत देणाऱ्याला जितकं टेन्शन असतं तितकंच मुलाखत घेणाऱ्यालाही. कारण कंपनीसाठी कोणता उमेदवार चांगला ठरेल हे पाहणं तितकंच कठीण असतं. प्रत्येक बॉसची मुलाखत घेण्याची पद्धतही वेगळी असते. असाच एक बॉस जो मुलाखतीवेळी कॉफी कप टेस्ट घेतो. एका पॉडकास्टमध्ये त्याने याची माहिती दिली आहे.
advertisement
3/6
या कॉफी कप टेस्टचा गुणवत्ता किंवा योग्यतेशी काही संबंध नाही. ही चाचणी एखादी व्यक्ती तिच्या नवीन कामाच्या ठिकाणी किती फिट बसू शकते, हे तपासते. आता तुम्ही म्हणाला यनाारून एखादी व्यक्ती चांगली टीम प्लेअर आहे की नाही हे कसं समजेल
advertisement
4/6
त्यांनी सांगितलं, "मुलाखतीदरम्यान मी उमेदवाराला किचनमध्ये घेऊन जातो. साहजिकच तिथून आम्ही कॉफी घेऊन बाहेर पडतो. मग पुन्हा मुलाखतीला सुरुवात करतो. मुलाखतीच्या शेवटी मी नेहमी पाहतो, ते म्हणजे मुलाखत देणारी व्यक्ती तो रिकामा कप पुन्हा किचनमध्ये घेऊन जाते की नाही"
advertisement
5/6
त्यांच्या मते, जे लोक ते कॉफी प्यायलेले कप उचलतात आणि धुण्यासाठी नेतात ते केवळ चांगलं काम करत नाहीत तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा आदर करतात यावरही त्यांनी भर दिला. याउलट जे लोक कप टेबलवरच सोडतात, त्यांना कंपनीतील इतरांची काहीही पडलेली नसते, हे दाखवतं.
advertisement
6/6
आता अशी मुलाखत कोणत्या कंपनीत कोणता बॉस घेतो हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. त्यांचं नाव आहे, ट्रेन्ट इन्स जे कंपनोने या सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ आहेत. त्यांनी द वेंचर पॉडकास्टला अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या आहेत. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)