TRENDING:

Dhurandhar : अक्षय खन्नाचं 'धुरंधर'मधील Fa9la Song, उच्चारतात फसला मग S ऐवजी 9 का?

Last Updated:
Dhurandhar Fa9la Song : धुरंधर फिल्ममधील अभिनेता अक्षय खन्नाची ज्या गाण्यावर एंट्री झाली ते फसला साँग. पण त्याच इंग्रजी नाव Fa9la मध्ये 9 का वापरण्यात आला आहे माहितीये का?
advertisement
1/5
अक्षय खन्नाचं 'धुरंधर'मधील Fa9la Song, उच्चारतात फसला मग S ऐवजी 9 का?
अभिनेता अक्षय खन्नाची धुरंधर फिल्ममध्ये ज्या गाण्यावर ग्रँड एंट्री घेतली, ते एंट्री साँग तुफान व्हायरल होतं आहे. लोक हे गाणं पुन्हा पुन्हा पाहत आहेत. Fa9la असं या गाण्याचं नाव, याचा उच्चार फसला असं आहे, मग S ऐवजी 9 का लिहिलं माहिती आहे का?
advertisement
2/5
खरं तर हे गाणं एक वर्ष आधीच 6 जून 2024 रोजी युट्युबवर रिलीज झालं होतं. बहरीनचा हिपहॉप आर्टिस्ट, रॅपर फ्लिपराचीच्या युट्युब चॅनेलवर हे गाणं आहे. जे त्यानेच गायलं आहे. गाण्याच्या क्रेडिटवरून ते त्यानेच लिहिलं आहे, असंही दिसतं. हे गाणं प्रोड्युस आणि मिक्स केलं आहे. डीजे आऊटलॉने ज्याचं खरं नाव मोहम्मद अलमोहरी आहे. तो डीजे म्युझिक प्रोड्युसर आणि साऊंड इंजिनीअर आहे. पण त्यावेळी या गाण्याचा फक्त ऑडिओ ट्रॅक आला होता. धुरंधर फिल्ममध्ये या ऑडिओ ट्रॅकला व्हिझुल मिळाले.  (फोटो : सोशल मीडिया)
advertisement
3/5
फसला ज्याचा अर्थ आहे मजामस्तीची वेळ, पार्टी टाइम, सगळं काही विसरून मजा करण्याची वेळ.  फ्लिपराचीच्याच गाण्यावर याचे अरबी लिरिक्स मिळतात. ज्याचा हिंदी अर्थ बघायला गेलं तर नाचण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं आहे. तुम्ही नाचा माझे चांगले मुव्ह्स आहेत तुम्ही नाचा, असा याचा ओबडधोबड हिंदी अर्थ.
advertisement
4/5
तुम्ही गाण्याचं इंग्रजी नाव पाहाल तर Fa9la असं आहे. उच्चार फसला आहे मग S ऐवजी इंग्रजी 9 अंक का वापरला? हे काहीतरी वेगळं करायचं म्हणून ठेवलेलं नाही आहे. तर माहितीनुसार 90 च्या दशकात जेव्हा मोबाईल जगभरात सामान्य होऊ लागले, तेव्हा त्याच्या इंग्रजी किबोर्डला अरबी लिपी सपोर्ट करायची नाही. मग अरबी तरुणांनी यावर जुगाड शोधला. त्यांनी अरबी अक्षरांना पर्याय म्हणून त्यांच्याशी मिळतेजुळते इंग्रजी अंक शोधून ते वापरले.
advertisement
5/5
म्हणून फासला गाण्याच्या नावातील 9 हे अक्षर म्हणजे एक अरेबिक अक्षर आहे. डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता अरबी अक्षरासाठी वापरण्यात आलेले अंक आणि अरबी अक्षर. 9 हा अंक कोणत्या अरबी अक्षरासाठी वापरण्यात आला ते तुम्ही पाहू शकता. (फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Dhurandhar : अक्षय खन्नाचं 'धुरंधर'मधील Fa9la Song, उच्चारतात फसला मग S ऐवजी 9 का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल