लहान मुलांचे कपडे चुकूनही रात्री घराबाहेर सुकवू नका, अंधश्रद्धा नाही यामागे आहे वैज्ञानिक कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
तुमची आई किंवा आजी रात्री लहान मुलांचे कपडे तुम्हाला घराबाहेर घालायला देत नसेल. रात्री लहान मुलांचे कपडे घराबाहेर घालायचं नाही असं त्या सांगतात, अनेक जण याला अंधश्रद्धा मानत असतील. पण विज्ञानही तेच सांगतं.
advertisement
1/7

रात्री लहान मुलांचे कपडे घराबाहेर सुकवू नये, असं अनेक लोक सांगतात. यामागे धार्मिक मान्यतेचा संदर्भ दिला जातो.
advertisement
2/7
धार्मिक मान्यतांनुसार, रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा अधिक मजबूत असते, जी कपड्यांद्वारे लहान मुलांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते.
advertisement
3/7
फक्त धार्मिक नाही विज्ञानात याची बरीच कारणं आहेत. त्यातील पहिलं म्हणजे रात्रीच्या वेळी दव पडल्याने कपडे सुकण्याऐवजी ओले होतात. कपड्यांमध्ये असलेल्या या आर्द्रतेमुळे, त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे जीवाणू, विषाणू आणि बुरशी वाढू शकतात.
advertisement
4/7
कपड्यांवर असलेल्या ओलाव्यामुळे अनेक प्रकारचे कीटक, डास रात्री कपड्यांवर बसतात आणि त्यांची अंडी आणि घाण सोडू शकतात. यामुळे मुलाला त्वचेची ऍलर्जी किंवा त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असू शकते.
advertisement
5/7
कपडे नीट सुकण्यासाठी सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान आवश्यक आहे. दुपारी कपडे सुकवण्यासाठी या दोन्ही गोष्टी सहज उपलब्ध होतात. तर रात्री ओलाव्यामुळे कपडे उशिरा सुकतात किंवा थोडे ओले राहतात.
advertisement
6/7
अनेक वेळा रात्री अचानक खराब हवामानामुळे धुतलेले कपडे धूळ, चिखल किंवा पावसामुळे घाण होतात आणि खराब होतात.
advertisement
7/7
रात्री झोपताना तुम्ही हवामान आणि कपड्यांची काळजी घेऊ शकत नाही. तर दुपारी तुम्ही कपडे आणि हवामान दोन्हीची काळजी घेऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
लहान मुलांचे कपडे चुकूनही रात्री घराबाहेर सुकवू नका, अंधश्रद्धा नाही यामागे आहे वैज्ञानिक कारण