Bigg Boss हिंदीच्या 3 धुरंधरांची BBM6 मध्ये एन्ट्री, ठरणार टॉप 5 चे स्पर्धक? पहिल्या एपिसोडपासूनच दिला धक्का
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६' चं बिगुल वाजलं आहे. पण यंदाच्या सीझनमध्ये चर्चा आहे ती तीन अशा चेहऱ्यांची, ज्यांनी आधीच सलमान खानच्या 'बिग बॉस हिंदी'च्या घरात धुमाकूळ घातला आहे.
advertisement
1/9

मुंबई: 'बिग बॉस मराठी ६' चं बिगुल वाजलं आहे आणि रितेश देशमुखच्या स्टाईलमध्ये १७ शिलेदारांनी घरात पाऊल ठेवलंय. पण यंदाच्या सीझनमध्ये चर्चा आहे ती तीन अशा चेहऱ्यांची, ज्यांनी आधीच सलमान खानच्या 'बिग बॉस हिंदी'च्या घरात धुमाकूळ घातला आहे.
advertisement
2/9
राकेश बापट, सोनाली राऊत आणि विशाल कोटियन हे तिघं आता मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाले आहेत. हिंदीचा अनुभव पाठीशी असलेले हे खिलाडी मराठी घरात कशी चाल खेळतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
advertisement
3/9
'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापट हा या घराचा सर्वात मॅच्युअर स्पर्धक मानला जातोय. राकेशने याआधी 'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या पर्वात हजेरी लावली होती. तिथे त्याची आणि शमिता शेट्टीची प्रेमकहाणी घराघरांत चर्चेचा विषय ठरली होती. बिग बॉस १५ मध्येही राकेशने शमिताला आधार देण्यासाठी वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. पण घराबाहेर येताच त्यांचं ब्रेकअप झालं.
advertisement
4/9
४७ वर्षांचा राकेश वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ-उतारांतून गेला आहे. २०११ मध्ये रिद्धी डोगराशी झालेलं लग्न २०१९ मध्ये मोडलं. आता घटस्फोटित आणि सिंगल असलेला राकेश मराठी बिग बॉसमध्ये पुन्हा प्रेमात पडणार की केवळ खेळावर लक्ष देणार? हे पाहणं रंजक ठरेल.
advertisement
5/9
३५ वर्षांची सोनाली राऊत म्हणजे मनोरंजनाचा फुल डोस! हिंदी बिग बॉसच्या आठव्या सीझनमध्ये तिने असा काही राडा केला होता की तिला पहिल्याच आठवड्यात बाहेर जावं लागलं होतं.
advertisement
6/9
मात्र, तिची लोकप्रियता पाहून तिला वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाली. 'द एक्सपोज' सारख्या सिनेमांतून झळकलेली सोनाली आता मराठी घरात 'कॅट फाईट्स' आणि ग्लॅमरची फोडणी देणार, हे तिच्या पहिल्या दिवसाच्या वागण्यावरूनच स्पष्ट झालंय.
advertisement
7/9
स्वतःला सलमान खानचा एकलव्य मानणारा विशाल कोटियन हा खेळाचा पक्का खेळाडू आहे. 'अकबर का बिरबल' फेम विशालने हिंदी बिग बॉस १५ मध्ये सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, याच सीझनमध्ये राकेश बापटची एक्स-गर्लफ्रेंड शमिता शेट्टीही होती.
advertisement
8/9
तेव्हा विशालने शमिता आणि राकेशच्या नात्यावर "राकेशने मोठा हात मारलाय" अशी कमेंट केली होती, ज्यावरून मोठा वाद झाला होता. आता त्याच राकेशसोबत विशालला एकाच छताखाली राहायचं आहे. जुन्या जखमा ताज्या होणार की हे दोघे मित्र बनणार?
advertisement
9/9
यंदा बिग बॉसने स्पर्धकांसमोर दोन दरवाजे ठेवले होते. हिंदीचा अनुभव असलेल्या या तिघांपैकी काहींनी 'शॉर्टकट' निवडला तर काहींनी 'मेहनत'. हिंदीत जो खेळ त्यांनी खेळला, तोच पॅटर्न इथे चालेल असं नाही, कारण इथे रितेश भाऊंचा धक्का असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss हिंदीच्या 3 धुरंधरांची BBM6 मध्ये एन्ट्री, ठरणार टॉप 5 चे स्पर्धक? पहिल्या एपिसोडपासूनच दिला धक्का