Alcohol : आयुष्यात पहिल्यांदाच दारू पिण्याच्या विचारात आहात, कोणती आणि किती प्यायची?
- Published by:Priya Lad
Last Updated:
First Time Drink Alcohol Limit : ख्रिसमस तोंडावर आला आहे. त्यानंतर 31 डिसेंबरची पार्टी येईल. यानिमिताताने अनेक जण पहिल्यांदाचा दारू पिण्याचा विचार करत असतील. पहिल्यांदा दारू पिण्याचा निर्णय शरीरावर परिणाम करणारा आहे. त्यामुळे दारू पिण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नाही, तर सुरक्षिततेसाठी ही माहिती.
advertisement
1/7

पहिल्यांदा दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला अल्कोहोलची नसते. त्यामुळे अगदी कमी प्रमाणात दारू प्यायले तरी नशा लवकर चढते. मेंदूची निर्णय क्षमता कमी होते, बॅलन्स बिघडतो आणि काही लोकांना चक्कर, मळमळ किंवा जास्त झोप येऊ शकते. काहींना हसू येतं, काहींना रडू येतं कारण दारू मेंदूतील भावनांवर थेट परिणाम करते.
advertisement
2/7
पहिल्यांदा दारू पिताना सगळ्यात मोठी चूक म्हणजे स्ट्राँग दारूपासून सुरुवात करणं. व्हिस्की, रम, वोडका हे प्रकार पहिल्यादा टाळलेलेच चांगले. एकाच वेळी वेगवेगळ्या दारू मिक्स करू नका. नाहीतर यामुळे पहिल्याच अनुभवात उलटी, डोकेदुखी किंवा घबराट होण्याची शक्यता जास्त असते.
advertisement
3/7
मग पहिल्यांदा कोणती दारू ट्राय करावी? तर पहिल्यांदा दारू पिणाऱ्यांसाठी दारूचा ब्रँड नाही, तर दारूचा प्रकार आणि स्ट्रेंथ महत्त्वाची असते. बिअर ही तुलनेने कमी अल्कोहोल असलेली दारू आहे. त्यामुळे पहिल्यांदा अनेकांना ती मॅनेजेबल वाटते. नशा हळूहळू चढते आणि कंट्रोल राहतो. स्वीट किंवा माइल्ड वाइनची चव सौम्य असते. परिणाम हळू होतो आणि काही लोकांसाठी हा अनुभव थोडा कन्फर्टेबल वाटतो. हलकी दारू म्हणजे सुरक्षित असतेच असं नाही, पण पहिल्यांदा स्ट्राँग दारूपेक्षा तिचा धोका कमी असतो.
advertisement
4/7
पहिल्यांदा किती प्रमाणात दारू प्यायची. तर पहिल्यांदा दारू पिताना Less is always better हा नियम सगळ्यात महत्वाचा आहे. बीअर असेल तर एक छोटी बॉटल किंवा कॅन पुरेसा. वाइन असेल तर अर्धा ग्लास म्हणजे 90 ते 100 मिली. हार्ड लीकर शक्यतो टाळावी, घेतलीच तर 1 स्मॉल पेगपेक्षा जास्त नाही.
advertisement
5/7
दारू हळूहळू प्यावी एकदम नाही. परिणाम जाणवायला वेळ लागतो, त्यामुळे आणखी घेऊ हा निर्णय लगेच घेऊ नका. पहिल्यांदा दारू पिताना रिकाम्या पोटी पिऊ नका. मधे मधे पाणी प्या. कोणाच्या प्रेशरमध्ये येऊ नका, गाडी चालवू नका, अस्वस्थ वाटत असेल तर थांबा.
advertisement
6/7
दारू पिणं ही स्पर्धा नाही. जास्त पिणं म्हणजे कूल हा फक्त गैरसमज आहे. दारू न पिणं हा पूर्णपणे सामान्य आणि योग्य पर्याय आहे. पहिल्यांदा दारू प्यायल्यावर आवडेलच असं नाही आणि आवडली नाही तर स्वतःला दोष देण्याची गरज नाही. प्रत्येक शरीराची प्रतिक्रिया वेगळी असते.
advertisement
7/7
सूचना : हा लेख फक्त माहिती आणि सुरक्षिततेच्या उद्देशाने देण्यात आला आहे. दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे. न्यूज18मराठी दारू पिण्यास प्रोत्साहन देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Alcohol : आयुष्यात पहिल्यांदाच दारू पिण्याच्या विचारात आहात, कोणती आणि किती प्यायची?