TRENDING:

Ganpati Visarjan : बाप्पा चालले गावाला! पण दहाव्या दिवशीच का? गणपती विसर्जनाची स्टोरी

Last Updated:
Ganesh Visarjan : अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. गणेश चतुर्थीपासून दहाव्या दिवशी बाप्पा गावाला जातात. पण दहाव्या दिवशीच का याचा तुम्ही विचार केला आहे का?
advertisement
1/5
बाप्पा चालले गावाला! पण दहाव्या दिवशीच का? गणपती विसर्जनाची स्टोरी
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचा जन्म झाला, असं मानलं जातं. या गणेश चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताचं लिखाण कार्य सुरू झाल्याचा उल्लेख पुराणात आढळतो.
advertisement
2/5
असं म्हणतात की, महर्षी वेदव्यासांनी गणपतीला महाभारताची रचना लिहिण्याची विनंती केली होती. त्यानुसार, गणपतीने 'आता माझी लेखणी थांबणार नाही', असं म्हणत लिहायला सुरुवात केली. शिवाय जर लेखणी थांबली तर मी लिहिणंही बंद करेन, असंदेखील म्हटलं.
advertisement
3/5
त्यावर महर्षी वेदव्यास म्हणाले की, देवा तुम्ही विद्वानांमध्ये अग्रभागी आहात आणि मी एक साधा ऋषी आहे, माझ्या श्लोकांमध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही ती दुरुस्त करून लिहून ठेवावी. अशाप्रकारे महाभारताचं लिखाण सुरू झालं आणि ते सलग 10 दिवस चाललं.
advertisement
4/5
अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा महाभारत लिहून पूर्ण झालं, तेव्हा बाप्पाचं शरीर स्थिर झालं होतं. 10 दिवस अजिबात हालचाल न केल्यामुळे बाप्पाच्या अंगावर धूळ, माती साचली होती. त्यानंतर बाप्पाने सरस्वती नदीत स्नान करून शरीर स्वच्छ केलं. त्यामुळे 10 दिवस गणपतीचा विधिवत पाहुणचार करून गणेशमूर्तीचं विसर्जन केलं जातं.
advertisement
5/5
(सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Ganpati Visarjan : बाप्पा चालले गावाला! पण दहाव्या दिवशीच का? गणपती विसर्जनाची स्टोरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल