TRENDING:

General Knowledge : असा जीव ज्याचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षाही असतात मोठे, फक्त 1 टक्के लोकच सांगू शकतील अचूक उत्तर

Last Updated:
ज्यांना या जीवाबद्दल माहित नाही, त्यांना नक्कीच त्याचं नाव आणि त्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागली असेल? चला मग जाणून घेऊ.
advertisement
1/6
GK : त्याच्या मेंदूपेक्षाही डोळे मोठे, तुम्हाला माहितीय का अशा जीवाचं नाव?
जगात असे अनेक प्राणी आणि पक्षी आहेत, जे त्यांच्या अनोख्या रचनेमुळे वैज्ञानिकांनाही आश्चर्यचकित करतात. त्यातलाच एक खास आणि रोचक जीव आहे, ज्याचे डोळे हे त्याच्या मेंदू किंवा डोक्यापेक्षा मोठे आहेत. तुम्हाला माहितीय का त्याचं नाव?
advertisement
2/6
ज्यांना या जीवाबद्दल माहित नाही, त्यांना नक्कीच त्याचं नाव आणि त्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागली असेल? चला मग जाणून घेऊ.
advertisement
3/6
हा जीव आहे शहामृग (Ostrich). हा पक्षी केवळ जगातील सर्वांत मोठा पक्षी म्हणूनच ओळखला जात नाही, तर आणखी एका विशेष कारणासाठी प्रसिद्ध आहे. शहामृर्गाचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षा मोठे असतात.
advertisement
4/6
नेचरल हिस्ट्री म्युझियमच्या माहितीनुसार, शहामृगाचे डोळे जवळपास ५ सेंटीमीटर व्यासाचे असतात, जे पृथ्वीवरील कोणत्याही स्थलीय प्राण्याच्या डोळ्यांपेक्षा मोठे मानले जातात. याच्या तुलनेत, त्याचा मेंदू फारच लहान, म्हणजेच डोळ्यांपेक्षा लहान आकाराचा असतो.
advertisement
5/6
हे ऐकून आश्चर्य वाटतं, पण यामागे निसर्गाचा एक चमत्कार आहे. शहामृग हा मोकळ्या कुरणांमध्ये राहणारा पक्षी आहे, जो भरधाव वेगाने धावू शकतो. पण या मोकळ्या जागांमध्ये शिकाऱ्यांपासून स्वत:चं रक्षण करणं महत्त्वाचं ठरतं. म्हणून त्याच्या डोळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रकाश आणि हालचाल टिपण्याची क्षमता असते. मोठे डोळे हे त्याला लांब अंतरावरही हालचाल ओळखण्यासाठी आणि शिकाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी मदत करतात.
advertisement
6/6
शहामृग उडू शकत नाही, पण त्याचा वेग खूप असतो ते ताशी 70 किलोमीटरपर्यंत धावू शकतात. त्याचे डोळे त्याला सतत सावध ठेवतात आणि वेगाने पळण्यास मदत करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : असा जीव ज्याचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षाही असतात मोठे, फक्त 1 टक्के लोकच सांगू शकतील अचूक उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल