हॉटेल रूममध्ये गेलेला गेस्ट 2 वर्षांनी बाहेर आला; बंद दरवाजा उघडताच सगळ्यांना धक्का, भयानक दृश्य
- Published by:Priya Lad
Last Updated:
Hotel Room : हॉटेल रूममध्ये तब्बल 2 वर्षे राहिलेला गेस्ट ज्याने चेक आऊट केलं त्यानंतर हॉटेल कर्मचारी त्या रूममध्ये गेले आणि दृश्य पाहून सगळे हादरले.
advertisement
1/5

आपण जास्त दिवसांसाठी कुठे बाहेर फिरायला गेलो की शक्यतो हॉटेलमध्ये थांबतो. पण शक्यतो आपला हा मुक्काम काही दिवस, काही आठवडे असतो. पण तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल एक व्यक्ती एका हॉटेलमध्ये तब्बल 2 वर्षे थांबली. ज्या रूममध्ये ती होती ती रूम बंदच असायची. तब्बल 2 वर्षांनंतर या गेस्टने चेकआऊट केलं आणि रूमचा दरवाजा उघडला असला भयानक दृश्य दिसलं.
advertisement
2/5
चीनच्या चांगचुन शहरातील एका ईस्पोर्ट्स हॉटेलमधील ही घटना आहे. जवळजवळ दोन वर्षे राहिल्यानंतर एका गेस्टने त्याची खोली पूर्णपणे कचऱ्याने भरून ठेवली होती. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. हॉटेल कर्मचाऱ्यांसाठी घाणेरड्या खोल्या काही नवीन नाहीत, पण या घटनेचा कालावधी आणि व्याप्ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
advertisement
3/5
व्हिडीओत तुम्ही कचऱ्याचे ढिग पाहू शकता. रूममध्ये टेकवे बॉक्स, फूड रॅपर, प्लॅस्टिक पिशव्या आणि रिकाम्या बाटल्या सर्वत्र विखुरलेल्या होत्या, ज्यामुळे खोलीचं मूळ स्वरूप ओळखता येत नव्हतं.
advertisement
4/5
ई-स्पोर्ट्ससाठी डिझाइन केलेले महागडे गेमिंग डेस्क आणि खुर्च्या देखील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गाडलेल्या आढळल्या. खोली राहण्याच्या जागेपेक्षा कचऱ्याच्या ढिगाऱ्यासारखी दिसत होती. शौचालयाभोवती वापरलेले टॉयलेट पेपर पसरलेले होते, सिंक बंद होता आणि जमिनीवर जाड घाण पसरली होती.
advertisement
5/5
या रूममध्ये राहणाऱ्या गेस्टने 12 डिसेंबरला चेकआऊट केलं. पण त्याने एकदाही हाऊसकिपिंगसाठी फोन केला नव्हता. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मते, तो माणूस कधीच खोलीबाहेर जात नव्हता. अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी त्याला कधीही समोरासमोर पाहिलं नाही. तो सतत जुगार खेळत होता, ऑनलाईन फूड मागवायाचा आणि कचरा थेट जमिनीवर फेकत होता. कालांतराने कचऱ्याचे थर जमा होत गेले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
हॉटेल रूममध्ये गेलेला गेस्ट 2 वर्षांनी बाहेर आला; बंद दरवाजा उघडताच सगळ्यांना धक्का, भयानक दृश्य