Ice cream : आईस्क्रिमला मराठीत काय म्हणतात? नाव वाचूनच तोंड गार पडेल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ice cream in marathi : लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रिम सर्वजण मोठ्या आवडीने खातात पण आईस्क्रिमचा मराठी शब्द अनेकांना माहिती नाही.
advertisement
1/7

उन्हाळा म्हटलं आईस्क्रिम आलंच. तुम्ही लग्न समारंभाला गेलात तर तिथंही लग्नाचं जेवण आईस्क्रिमशिवाय पूर्ण होतच नाही. जेवणाच्या शेवटी आईस्क्रिम असतंच.
advertisement
2/7
अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारं हे आईस्क्रिम. यात तसे बरेच प्रकार आहे. वेगवेगळ्या चवीच्या आईस्क्रिम मिळतात. पण आईस्क्रिम हा इंग्रजी शब्द, मग आईस्क्रिमला मराठीत काय म्हणतात?
advertisement
3/7
आईस्क्रिमला मराठीत काय म्हणतात? सोशल मीडियावर हा प्रश्न विचारण्यात आला. यावर बऱ्याच युझर्सनी कमेंट करत उत्तर दिलं आहे.
advertisement
4/7
काहींनी आईस म्हणजे बर्फ आणि क्रीम म्हणजे मलाई, आईस्क्रि म्हणजे बर्फ मलाई असं शब्दश: भाषांतर केलं आहे. मलाई आणि साखरेने आच्छादलेले बर्फाचा गोळा म्हटलं आहे.
advertisement
5/7
काहींनी बोली भाषेत आईस्क्रिमला काय म्हणतात ते सांगितलं आहे. गावाकडे याला गारिगार असं म्हणत असल्याचं काही युझर्स म्हणाले.
advertisement
6/7
तसंच दुग्धयुक्त शर्करा मिश्रित शीत खाद्य, दुग्धशर्करा हिमनग गोल गट्टू, दुग्धशर्करा युक्त घनघोल गट्टू, दुग्धशर्करा युक्त घनघोल गट्टू, दुग्धशर्करा युक्त घनघोल हिम गट्टू, दुग्धशर्करा युक्त शीत घनगोल गट्टू, दुग्धशर्करा युक्त शीत घनगोल घट्ट गोळा, दुग्धशर्करा मिश्रित बर्फाचा गारागर घनगट्ट गोळा, युक्त शीत घनगोल गट्टू, दुग्धशर्करा युक्त शीतल गोल गट्टू, अतिशीत दुग्धशर्करा युक्त घनघोर गोल शंकू अशी नावंही युझर्सनी सांगितली आहेत.
advertisement
7/7
या व्यतिरिक्त आईस्क्रिमला मराठी शब्द तुम्हाला काही माहिती असेल किंवा तुम्ही तुमच्या बोली भाषेत आईस्क्रिमला काय म्हणता ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.