TRENDING:

अद्भुत! बांधलं नाही तर प्रिंट केलंय हे घर, भारतातील पहिला 3D प्रिंटेड विला पुण्यात, पाहा PHOTO

Last Updated:
3D Printed home : भारतातील पहिल्या 3D-प्रिंटेड व्हिलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. अद्भुत तंत्रज्ञानाने इंटरनेट युझर्सना आश्चर्यचकित केलं आहे.
advertisement
1/7
बांधलं नाही, प्रिंट केलंय हे घर, भारतातील पहिला 3D प्रिंटेड विला पुण्यात
भारतातील तंत्रज्ञान आणि वास्तुकला क्षेत्रात एक नवा इतिहास रचत देशातील पहिला 3डी-प्रिंटेड व्हिला पुण्यात साकारण्यात आला आहे.
advertisement
2/7
या अनोख्या घराचा व्हिडीओ कंटेंट क्रिएटर प्रियम सारस्वतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, ज्यामुळे सोशल मीडियावर या घराची खूप चर्चा होत आहे.
advertisement
3/7
हे घर बांधण्यासाठी विशेष काँक्रीट 3D प्रिंटर वापरण्यात आला होता, जो संपूर्ण रचना तयार करतो. या 2038 चौरस फूट व्हिलामध्ये प्रशस्त राहण्याची जागा आणि 2 बेडरूम आहेत.
advertisement
4/7
घराच्या बाहेरील भिंती दुहेरी थरांच्या बनवल्या आहेत, ज्यामध्ये पोकळ जागा आहेत जेणेकरून पाईप, तारा सहजपणे घालता येतील. भिंतींना चांगलं इन्सुलेशन आहे, जे कमी ऊर्जेचा वापर करून थंड किंवा गरम तापमान राखण्यास मदत करतं.
advertisement
5/7
पारंपारिक घर बांधण्यासाठी 1 वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. पण या 3डी-प्रिंटेड व्हिलाचं बांधकाम फक्त 4 महिन्यांत पूर्ण झालं.
advertisement
6/7
हा अनोखा व्हिला गोदरेज प्रॉपर्टीज आणि त्वस्ता इंजिनिअरिंग यांच्या भागीदारीत बांधलं गेलं आहे.  व्हिडिओमध्ये, प्रकल्प संचालक म्हणाले, "हे घर बांधलं गेलं नाही, तर प्रिंट केलं आहे. जमिनीवर एक मोठा 3D प्रिंटर बसवण्यात आला होता आणि त्याने डिझाइननुसार संपूर्ण घर छापलं."
advertisement
7/7
नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पाहून सोशल मीडिया वापरकर्तेही आश्चर्यचकित झाले आहेत. तुम्हाला हे घर कसं वाटलं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
अद्भुत! बांधलं नाही तर प्रिंट केलंय हे घर, भारतातील पहिला 3D प्रिंटेड विला पुण्यात, पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल