TRENDING:

Indian Railway : दिवसभर डुगूडुगू चालणारी ट्रेन रात्री वेगाने कशी धावते, अंधारात रेल्वेचा स्पीड का वाढतो?

Last Updated:
Indian Railway Speed Facts : तुम्ही पाहिलं असेल की ट्रेन दिवसा हळू आणि रात्री एकदम वेगाने चालतात, असं का? दिवस आणि रात्रीचा ट्रेनच्या वेगाशी काही संबंध आहे का?
advertisement
1/5
दिवसा डुगूडुगू चालणारी ट्रेन रात्री वेगाने कशी धावते, अंधारात स्पीड का वाढतो?
तुम्ही दररोज ट्रेनने प्रवास करत असाल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की दिवसभर ट्रेन हळूहळू चालते पण तीच ट्रेन रात्री मात्र एकदम वेगाने चालते. अगदी स्लो ट्रेनचा वेगही फास्ट काय सुपरफास्ट होतो.
advertisement
2/5
दिवसा प्रवास करताना रेल्वे प्रवाशांची अनेकदा तक्रार असते की काय गाडी रडत रडत चालत आहेत. रात्री ही परिस्थिती क्वचितच उद्भवते. अनेक प्रवाशांना अनेकदा प्रश्न पडतो की ट्रेनचा वेग दिवसा कमी असतो, तो रात्री इतका कसा काय वाढतो. दिवस आणि रात्रीचा वेगाशी का संबंध आहे? ट्रेन दिवसा कमी वेगाने आणि रात्री जास्त वेगाने का धावते?
advertisement
3/5
रात्रीच्या वेळी रेल्वेचा वेग वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे रेल्वे रुळांवर मानवी आणि प्राण्यांची वर्दळ लक्षणीयरित्या कमी असते. स्वच्छ ट्रॅकमुळे लोको पायलट पूर्ण वेगाने ट्रेन चालवू शकतो.
advertisement
4/5
रात्रीच्या वेळी ट्रेन इंजिन जास्त वीज निर्माण करते. रात्रीच्या वेळी ट्रॅकची दुरुस्ती देखील कमी होते. यामुळे लोको पायलट बिनधास्त ट्रेन चालवतात.
advertisement
5/5
अंधारात ट्रेन चालवण्याचा एक मोठा फायदा म्हणजे सिग्नल खूप अंतरावरून दिसतात. यामुळे लोको पायलटला ट्रेन थांबवायची की नाही हे दूरवरून ठरवता येते. ट्रेनचा वेग कमी करण्याची गरज नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indian Railway : दिवसभर डुगूडुगू चालणारी ट्रेन रात्री वेगाने कशी धावते, अंधारात रेल्वेचा स्पीड का वाढतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल