थर्टी फर्स्ट पार्टीला दारू पिण्याआधी हे नियम वाचाच; नाहीतर पस्तावाल, नवीन वर्षाची लागेल वाट
- Published by:Priya Lad
Last Updated:
Liquor Policy : दारू पिणं हा वैयक्तिक निर्णय असला तरी तो जाणीवपूर्वक, मर्यादेत आणि सुरक्षित पद्धतीने घेतला पाहिजे. योग्य नियम पाळले तर आरोग्य, नाती आणि सुरक्षितता सगळेच सुरक्षित राहतात.
advertisement
1/9

दारू कधीही रिकाम्या पोटी पिऊ नये. पोटात अन्न नसल्यास अल्कोहोल थेट रक्तात झपाट्याने मिसळतं आणि नशा पटकन चढते. त्यामुळे पिण्याआधी थोडं काहीतरी खा. दारू पिताना चकणा खाणेही फायदेशीर असतं, कारण त्यामुळे अल्कोहोल शरीरात हळू शोषला जातो.
advertisement
2/9
दारू पिताना शरीरात पाण्याची कमतरता नसावी, यासाठी आधी पाणी प्या. प्रत्येक पेग किंवा ग्लासनंतर पाणी पिण्याची सवय ठेवल्यास शरीर हायड्रेट राहतं आणि नशा नियंत्रित राहते.
advertisement
3/9
पहिल्यांदा दारू पिणार असाल तर स्वतःची मर्यादा आधीच ठरवा आणि दबावाखाली कधीही दारू पिऊ नका. जर तुम्ही कोणतीही औषधं घेत असाल, विशेषतः झोपेची, वेदनाशामक किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित औषधे तर दारू टाळणेच योग्य.
advertisement
4/9
दारू पिताना सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे हळू हळू पिणं पटकन किंवा Bottoms up पद्धतीने पिणं धोकादायक ठरू शकतं. उभं राहून दारू पिण्याऐवजी शांतपणे बसून पिणं अधिक सुरक्षित मानले जाते.
advertisement
5/9
एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या दारू उदा. बिअर, व्हिस्की, वाइन मिसळून पिणे टाळावं. यामुळे hangover जास्त होतो आणि शरीरावर ताण पडतो.
advertisement
6/9
वजन, वय, लिंग आणि आरोग्य यावर दारूचा परिणाम अवलंबून असतो. साधारणपणे शरीराला एक पेग पचवायला सुमारे एक तास लागतो. त्यामुळे कमी वेळेत जास्त दारू पिणं टाळावं. नशा येतेय असं वाटू लागलं की लगेच थांबणं हाच शहाणपणाचा निर्णय आहे.
advertisement
7/9
रोज दारू पिण्याची सवय लागू देऊ नये. आठवड्यात काही दिवस पूर्णपणे दारू न पिणं आरोग्यासाठी आवश्यक आहे.
advertisement
8/9
दारू पिऊन वाहन चालवणं हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि जीवघेणा देखील ठरू शकतो. नशेत महत्त्वाचे निर्णय घेणे, फोनवर वाद घालणे किंवा संदेश पाठवणं यासारख्या गोष्टी टाळाव्यात.
advertisement
9/9
पार्टीत किंवा सामाजिक कार्यक्रमात दारू न पिणाऱ्यांचा आदर करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. Cheers म्हणणं ऐच्छिक असतं, जबरदस्ती नसावी. ऑफिस पार्टी किंवा कौटुंबिक कार्यक्रमात नेहमीच मर्यादा पाळावी आणि सभ्य वागणूक ठेवावी. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
थर्टी फर्स्ट पार्टीला दारू पिण्याआधी हे नियम वाचाच; नाहीतर पस्तावाल, नवीन वर्षाची लागेल वाट