Mahakumbha 2025 : नागा साधू कपडे का घालत नाहीत? नग्न राहण्यामागचं कारण काय
- Published by:Priya Lad
Last Updated:
सामान्य ऋषी आणि संत सहसा पिवळे, भगवे किंवा लाल रंगाची वस्त्र घालतात. नागा साधू मात्र कपडे घालत नाहीत. त्यांच्या आयुष्याबद्दल नेहमी लोकांच्या मनात कुतूहल असतं.
advertisement
1/8

कुंभमेळ्याच्या शाही स्नानात, आपल्या युद्धकलेचं प्रात्यक्षिक करत स्नानासाठी जाणारा नागा साधूंचा गट तुम्ही नक्कीच पाहिला असेल. आदिगुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या विविध आखाड्यांमध्ये राहणारे हे साधू नग्न राहतात, अंगाला भस्म लावतात, युद्धकलेत पारंगत असतात आणि हिंदू धर्माचे अनुयायी असतात. अशा साधूंना ‘नागा साधू’ म्हणतात.
advertisement
2/8
सनातन धर्मात इतर ऋषी-मुनींप्रमाणे नागा साधूंनाही खूप महत्त्व आहे. ते भौतिक सुखांचा त्याग करून सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालतात. त्यांना ईश्वरप्राप्तीचं माध्यम मानलं जातं.
advertisement
3/8
स्वत:ला देवाचा दूत मानणाऱ्या नागा साधूंचं आयुष्य फार कठीण असतं. नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूप दीर्घ आणि कठीण मानली जाते. विविध नागा आखाड्यांमध्ये नागा भिक्षू होण्याची दीक्षा मिळते. प्रत्येक आखाड्याची स्वतःची श्रद्धा आणि परंपरा असते आणि त्यानुसार त्यांना दीक्षा दिली जाते. अनेक आखाड्यांमध्ये नागा साधूंना ‘भुट्टो’ या नावानंही संबोधलं जातं.
advertisement
4/8
आखाड्यात सामील झाल्यानंतर त्यांना गुरुसेवेबरोबरच सर्व लहानमोठी कामं दिली जातात. नागा साधूंचं जीवन अत्यंत गुंतागुंतीचं असतं. कोणत्याही व्यक्तीला नागा साधू बनण्यासाठी 12 वर्षांचा कालावधी लागतो, असं म्हटलं जातं.
advertisement
5/8
नागा साधू बनण्याच्या प्रक्रियेच्या सुरुवातीला, प्रथम ब्रह्मचर्य शिकावं लागतं. यामध्ये यश मिळाल्यानंतर महापुरुष दीक्षा दिली जाते. यानंतर यज्ञोपवीता पठण केलं जातं.
advertisement
6/8
नागा साधू बनल्यानंतर, ती व्यक्ती गाव किंवा शहरातील गर्दीचं जीवन सोडून देते आणि जगण्यासाठी डोंगरावरील जंगलात जाते. त्यांच्या राहण्याच्या जागा अशा ठिकाणी असतात जिथं सहसा कोणी येत किंवा जात नाही.
advertisement
7/8
ते झोपड्यांमध्ये राहतात आणि त्यांच्याकडे विशेष जागा किंवा घर नसते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नागा साधू झोपण्यासाठी पलंगाचा वापर करत नाहीत. त्यांचा पेहराव आणि खाण्याच्या सवयी सामान्य लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत.
advertisement
8/8
नागा साधू बनण्याच्या प्रक्रियेत सहा वर्षे खूप महत्त्वाची असतात. या काळात व्यक्ती नागा साधू बनण्यासाठी आवश्यक माहिती मिळते. या काळात ती व्यक्ती फक्त लंगोट घालते. कुंभमेळ्यात ते प्रण घेतात, त्यानंतर ते लंगोटी वापरणंही सोडून देतात. नंतर आयुष्यभर ते कपडे घालत नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mahakumbha 2025 : नागा साधू कपडे का घालत नाहीत? नग्न राहण्यामागचं कारण काय