TRENDING:

Female Naga Sadhu : महाकुंभात मासिक पाळी आल्यावर महिला नागा साधू काय करतात?

Last Updated:
Mahakumbh 2025 Female Naga Sadhu : महिला नागा साधूचं जीवन ध्यान, तपस्या आणि भक्तीने परिपूर्ण आहे. मासिक पाळीत महिला नागा साधू महाकुंभमध्ये स्नान आणि इतर धार्मिक प्रक्रिया कशा करतात हे जाणून घेऊया.
advertisement
1/8
Female Naga Sadhu : महाकुंभात मासिक पाळी आल्यावर महिला नागा साधू काय करतात?
महिला नागा साधू बनण्यासाठी एक कठीण दीक्षा प्रक्रियेतून जावं लागतं. या प्रक्रियेत स्त्रीला 6 ते 12 वर्षे ब्रह्मचर्य पाळावं लागतं. यातून त्या आपण सांसारिक आसक्ती सोडली, आपण पूर्णपणे देवाला समर्पित आहोत हे सिद्ध करतात. यानंतर महिलेला पिंडदान आणि मुंडण करावं लागतं.
advertisement
2/8
महिला नागा साधूचे जीवन आध्यात्मिक साधना, उपासना, जप आणि ध्यान यांनी परिपूर्ण आहे. महिला नागा साधूंचा दिवस पूजा आणि ध्यानाने सुरू होतो. त्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठतात आणि भगवान शिवाचा जप करतात, संध्याकाळी भगवान दत्तात्रेयांची पूजा करतात.  त्या विशेषतः शिव, पार्वती आणि माता काली यांची पूजा करतात.
advertisement
3/8
महिला नागा साधूंचा आहार अत्यंत साधा आणि नैसर्गिक असतो. त्या शाकाहारी आहेत.  त्या प्रामुख्याने कंदमुळं, फळं, औषधी वनस्पती आणि पानं खातात. शिजवलेलं अन्न त्या खात नाहीत.
advertisement
4/8
महिला नागा साधू नग्न राहू शकत नाहीत. त्यांना सार्वजनिक ठिकाणी कपडे घालणं आवश्यक आहे. त्यांना भगव्या रंगाचे न शिवलेले कपडे घालावे लागतात. जे शरीराभोवती गुंडाळलं जातं याला 'गंटी' म्हणतात.
advertisement
5/8
कपड्यांव्यतिरिक्त महिला नागा साधूंनी त्यांच्या कपाळावर टिळक लावणंदेखील आवश्यक आहे.
advertisement
6/8
महिला नागा साधूंना त्यांच्या मासिक पाळीत काही खास नियम आहेत. त्या काळात त्या देवाची पूजा आणि स्पर्श टाळते.
advertisement
7/8
मासिक पाळी दरम्यान धार्मिक आणि शारीरिक शुद्धता राखण्यासाठी महिला नागा साधू प्रायव्हेट भागावर एक लहान कापड ठेवतात. आपल्या शरीराभोवती राख लावतात.
advertisement
8/8
महिला नागा साधू मासिक पाळी दरम्यान गंगाजल शिंपडतात, परंतु गंगेत स्नान करत नाहीत. त्याऐवजी त्या आखाड्यात पाण्यानं स्नान करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Female Naga Sadhu : महाकुंभात मासिक पाळी आल्यावर महिला नागा साधू काय करतात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल