Mobile Interesting Facts : फोन रिस्टार्ट करायचा की पावर ऑफ? सीक्रेट समजलं तर मोबाईल कधीच होणार नाही खराब
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mobile Interesting Facts : फोनमध्ये पॉवर ऑफ आणि रिस्टार्ट असे दोन पर्याय, खरंतर त्यांचं एकच काम. मग ते पर्याय देण्याला अर्थ काय? त्यांचा फायदा काय? कधी कोणता वापरायचा? याचा विचार तुम्ही केला आहे का?
advertisement
1/5

आपल्याला फोनमध्ये पॉवर ऑफ आणि रिस्टार्ट दोन्ही पर्याय दिले जातात. फोन बंद केल्याने तो बंद होतो आणि आपल्याला तो पुन्हा चालू करावा लागतो. तर रिस्टार्ट केल्याने फोन बंद होतो आणि आपोआप चालू होतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की दोन्ही पर्याय सारखंच काम करतात मग दोन पर्याय देण्याचा काय फायदा आहे आणि या दोन्ही पर्यायांसह फोनचं काय होतं?
advertisement
2/5
दर आठवड्याला तुमचा फोन रिस्टार्ट केल्याने मेमरी लीक होणं टाळण्यास देखील मदत होते. बॅटरीज प्लसने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असं म्हटलं आहे की जेव्हा एखाद्या अॅपला काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेमरी आवश्यक असते तेव्हा मेमरी लीक होते, पण जेव्हा अॅप वापरात नसतं तेव्हा मेमरी लीक होत नाही.
advertisement
3/5
फोन रिस्टार्ट केल्याने कनेक्टिव्हिटी समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. जुने स्मार्टफोन कधीकधी डेटा आणि वाय-फायशी कनेक्ट होत नाहीत आणि फोन रिस्टार्ट केल्याने ते पुन्हा कनेक्ट होतात.
advertisement
4/5
तुमच्या फोनची पॉवर बंद केल्याने त्याचा कॅशे डेटा साफ होण्यास मदत होईल, ज्यामुळे तुमचा फोन अधिक कार्यक्षमतेने काम करू शकेल. तुमचा फोन बंद करणं आणि रिस्टार्ट करणं या व्यतिरिक्त तुम्ही फोन चालू असताना बॅटरीच्या आरोग्यावर ताण येऊ शकणारे बॅकग्राउंड अॅप्स देखील साफ केले पाहिजेत.
advertisement
5/5
जेव्हा तुमचा फोन हँग होतो, अॅप्स व्यवस्थित चालत नाहीत किंवा सॉफ्टवेअर एरर येतात तेव्हा तुमचा फोन रिस्टार्ट करणं सामान्य आहे. तुमचा फोन नीट चालण्यासाठी ही एक चांगली पद्धत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mobile Interesting Facts : फोन रिस्टार्ट करायचा की पावर ऑफ? सीक्रेट समजलं तर मोबाईल कधीच होणार नाही खराब